वृत्तसंस्था
ओटावा : कोरोना लसीच्या सक्तीला विरोध करण्यासाठी कॅनडात दोन आठवड्यांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे कॅनडात चक्काजाम झाला आहे. Strong opposition to the corona vaccine Truck drivers’ jam the Roads in Canada
आंदोलकांनी राजधानी आेटावाला ठप्प केले. आेटावात ठिय्या देणाऱ्या ट्रकचालकांनी दिवसभर कर्णकर्कश भोंगे वाजवले. त्याचा स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. चालक रस्त्यावर हॉकी खेळताना दिसले. आंदोलकांनी रस्त्यावरच सोफे लावून मुक्काम केल्याचे चित्र दिसते.
आेटावामधील अराजकाची स्थिती पाहता महापौरांनी आणीबाणी जाहीर केली.
हा प्रश्न सोडवला जाईल, अशी ग्वाही कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी गुरुवारी संसदेत दिली. परंतु ट्रकचालकांना लसची सक्ती आहे, या भूमिकेवरून ट्रुडो अद्यापही माघार घेण्यास तयार नाहीत. त्यांनी विरोधी पक्षाला सद्य:स्थितीची माहिती दिली. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख जगमितसिंह म्हणाले, हे सरकारच्या विरोधातील आंदोलन आहे.
Strong opposition to the corona vaccine Truck drivers’ jam the Roads in Canada
महत्त्वाच्या बातम्या
- नागपुरात मिर्चीचा जोरदार ठसका; आवक कमी झाल्याने भाववाढ; मिरची झाली दामदुप्पट
- युक्रेनवर रशिया करणार आठवड्याभरात हल्ला : लष्कराने तिन्ही बाजूंनी घेरले, पाणीपुरवठा रोखला
- मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सब रजिस्ट्रार ऑफिसचे कामकाज मंदगती
- सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्वाचा जयंत पाटील यांचे प्रतिपादन
- दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन
- SKIN TO SKIN TOUCH CASE : बाल लैंगिक शोषण कायद्याखाली एका पाठोपाठ एक वादग्रस्त निकाल देणाऱ्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवल यांचा राजीनामा