प्रतिनिधी
बेल्लारी : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज स्वतःहून सहभागी होत राजकीय बळ दिले, ते देखील एका वैशिष्ट्यपूर्ण गावातून!! सोनिया गांधी या कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातील बेल्लारी गावात राहुल गांधीं बरोबर भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत चालल्या. त्यामुळे भारत जोडो यात्रेतील हजारो कार्यकर्त्यांना उत्साहाचे उधाण आले. Strength of Sonia Gandhi’s participation in Hull Gandhi’s Bharat Jodo Yatra
सोनियांची बेल्लारी
सोनिया गांधी ज्या बेल्लारी मध्ये भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्या, हेच ते बेल्लारी गाव आहे ज्या गावाच्या नावाने असलेल्या लोकसभा मतदारसंघातून त्या 1999 मध्ये खासदार होऊन लोकसभेत पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा स्वराज यांचा 56 हजार मतांनी पराभव केला होता. काँग्रेसच्या पडत्या काळात बेल्लारी लोकसभा मतदारसंघानेच काँग्रेसला हात दिला होता. या पार्श्वभूमीवर तब्बल 21 वर्षांनी सोनिया गांधी बेल्लारी पोहोचल्या आणि त्यांनी राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. सोनिया गांधी महिनाभरापूर्वीच कोरोनातून बऱ्या झाले आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रेत त्या फार वेळ चालल्या नाहीत. त्या 15 मिनिटे चालल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांशी, महिलांशी चालताना संवाद साधला आणि नंतर त्या गाडीत बसल्या. पण भारत जोडो यात्रेतला पायी सहभाग कर्नाटकातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरला आहे.
इंदिराजींचे चिकमंगरुळ
त्यांच्यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील आपल्या राजकीय दृष्ट्या पडत्या काळात कर्नाटक मधल्या चिकमंगळूर मतदारसंघाचा सहारा घेतला होता. 1977 मध्ये त्या रायबरेलीतंन पराभूत झाल्या होत्या. पण नंतर एका पोटनिवडणुकीत त्या चिकमंगळूर मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि लोकसभेवर निवडून गेल्या. एक प्रकारे कर्नाटक हे राज्य गांधी परिवारासाठी असे राजकीय भावनिक दृष्ट्या जोडले गेले आहे आणि म्हणूनच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रत्यक्ष पायी सहभागासाठी सोनिया गांधी यांनी आपलाच जुना मतदार संघ बेल्लारीची निवड केल्याचे मानले जात आहेत.
Strength of Sonia Gandhi’s participation in Hull Gandhi’s Bharat Jodo Yatra
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे एकनाथ शिंदेसोबत; तर नातू निहार ठाकरे व्यासपीठावर शिंदेंशेजारी!!
- बिल्किस बानूच्या विषय काढून दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे पवारांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब!!
- चांदीचे धनुष्य, १११ साधूंचा आशीर्वाद; शिंदे गटाचा हिंदुत्वाचा शंखनाद
- शिवसेनेच्या मूळ गीताचा आवाज घुमला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात; अवधूत गुप्ते आणि नंदेश उमप व्यासपीठावर!!