प्रतिनिधी
नवी दिल्ली : एका कंपनीला सरकारने ठरल्याप्रमाणे स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सी बँड दिले. त्याबरोबर “ई बँड” पण दिले… योग्य पैसे दिले योग्य काम झाले…, ही स्टोरी शेअर केली आहे, प्रख्यात उद्योगपती सुनील कुमार मित्तल यांनी!! Story shared by Sunil Kumar Mittal
केंद्र सरकारने 5g स्पेक्ट्रमच्या लिलावात नुकतेच 5g स्पेक्ट्रमचे एलोकेशन एअरटेल कंपनीला झाले आहे. त्याचे 8312.4 कोटी रुपये कंपनीने ताबडतोब अदा केले. कंपनीला सरकारने ताबडतोब स्पेक्ट्रमचे फ्रिक्वेन्सी बँड एलोकेशन तर केलेच, पण त्याच वेळी आधीच जाहीर केलेले “ई बँड” पण देऊन टाकले. याची स्टोरी सुनील कुमार मित्तल यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केली आहे.
या स्टोरीत सुनील कुमार मित्तल म्हणतात, “याला” म्हणतात इज ऑफ डूइंग बिजनेस!! एअरटेल कंपनीने पैसे भरले. सरकारने ताबडतोब आश्वासनांची पूर्ती केली. कुठेही धावपळ नाही. सरकारी कार्यालयातून गोंधळ गडबड नाही. हेलपाटे मारणे नाही. फायली अडवून ठेवणे नाही. योग्य पैसे भरले, योग्य काम झाले!!
गेल्या 30 वर्षात मी टेलिकॉम सेक्टर मध्ये काम करतो आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचा मला प्रदीर्घ अनुभव आहे. पण आजच्यासारखे काम झाल्याचा मला यापूर्वी केव्हाही अनुभव आला नाही. आता मात्र वेगाने काम होत आहे. नेतृत्वापासून अगदी तळातल्या कर्मचाऱ्यापर्यंत वेगात काम. कुठेही अडथळा नाही. हा केवढा मोठा बदल आहे. देशाच्या महासत्तेच्या वाटचालीसाठी हा बदल फार उपयुक्त ठरतो आहे.
Story shared by Sunil Kumar Mittal
महत्वाच्या बातम्या
- Bhandara Flood Updates : भंडारा जिल्ह्यात ४२ निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था
- पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८, तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद
- पावसाळी अधिवेशन : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4,700 कोटींची तरतूद, 25,826 कोटींच्या पुरवणी मागण्या
- विधान परिषदेच्या सभापतीपदाची लढाई…; पण त्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी!!