• Download App
    शेअर बाजाराने फुंकले एलआयसीच्या महसुलात प्राण, गुंतवणुकीतून कमाविला ३७ हजार कोटी रुपयांचा विक्रमी नफा|Stock market blows LIC's revenue, record profit of Rs 37,000 crore from investments

    शेअर बाजाराने फुंकले एलआयसीच्या महसुलात प्राण, गुंतवणुकीतून कमाविला ३७ हजार कोटी रुपयांचा विक्रमी नफा

    गेल्या वर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना भारतीय जीवन बीमा निगमने (एलआयसी) शेअर बाजारात गुंतविलेल्या निधीवरून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनच एलआयसीने तब्बल ३७ हजार कोटी रुपये नफा कमाविला आहे. गेल्या ६७ वर्षांतील हा सर्वाधिक नफा आहे. गेल्या वर्षीपेक्षा ४४.४ टक्यांनी वाढ झाली आहे. एलआयसीला २०२० मध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीतून २५,६२५ कोटी रुपये नफा झाला आहे.Stock market blows LIC’s revenue, record profit of Rs 37,000 crore from investments


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना भारतीय जीवन बीमा निगमने (एलआयसी) शेअर बाजारात गुंतविलेल्या निधीवरून चिंता व्यक्त केली जात होती.

    मात्र, शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनच एलआयसीने तब्बल ३७ हजार कोटी रुपये नफा कमाविला आहे. गेल्या ६७ वर्षांतील हा सर्वाधिक नफा आहे. गेल्या वर्षीपेक्षा ४४.४ टक्यांनी वाढ झाली आहे. एलआयसीला २०२० मध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीतून २५,६२५ कोटी रुपये नफा झाला आहे.



    एलआयसी ही देशातील सर्वात मोठी गुंतवणूक संस्थाही आहे. एलआयसीने २०२१ मध्ये ९४ हजार कोटी रुपये गुंतविले होते. विशेष म्हणजे एलआयसी ३४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करते. गाहकांना पॉलीसी विकून मिळालेला नफा सर्वात जास्त आहे.

    एलआयसीला झालेल्या विक्रमी नफ्यामुळे गुंतवणूकदार खुशीत आहेत. कारण त्यांना मिलणारा लाभांश वाढणार आहे. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवरील नफाही वाढणार आहे.

    गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्याचा शेअर बाजारावर परिणाम होऊन बाजार कोसळला. मात्र, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे बुस्टर दिले. त्यामुळे शेअर बाजार सावरला. यामुळे एलआयसीचा नफा वाढला.

    एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश कुमार गुप्ता म्हणाले, आम्ही नवीन संधींचा शोध घेत गेलो. दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण आखले. त्यामुळे आमच्या नफ्यात वाढ झाली आहे.

    Stock market blows LIC’s revenue, record profit of Rs 37,000 crore from investments

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालय म्हणाले – पत्नी मोलकरीण नाही, जीवनसाथी आहे:घटस्फोटाच्या प्रकरणात म्हटले – जेवण न बनवणे क्रूरता नाही, घरकाम पतीचीही जबाबदारी

    ECI : निवडणुकीच्या जाहिरातींसाठी पक्षांना प्रमाणपत्र घ्यावे लागेल; निवडणूक आयोगाचे निर्देश

    LPG Tankers : द फोकस एक्सप्लेनर : देशाला दरमहा ३० LPG टँकरची गरज; त्यापैकी ६ होर्मुझमध्ये अडकले, गॅस पुरवठ्याचे पुढे काय?