• Download App
    गुजरातमधल्या स्टर्लिंग घोटाळ्यात अहमद पटेलांचा जावई इरफान सिद्दीकी, अभिनेता संजय खान, दिनो मोरिया यांच्या मालमत्तांवर ED ची जप्तीची कारवाई|Sterling-Biotech fraud case; Enforcement Directorate (ED) has provisionally attached movable & immovable properties worth Rs. 8.79 Crore under PMLA in Sandesara Group case. With this attachment, ED

    गुजरातमधल्या स्टर्लिंग घोटाळ्यात अहमद पटेलांचा जावई इरफान सिद्दीकी, अभिनेता संजय खान, दिनो मोरिया यांच्या मालमत्तांवर ED ची जप्तीची कारवाई

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : मुंबई – काँग्रेसचे दिवंगत नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी, अभिनेता संजय खान, अभिनेता दिनो मोरिया आणि डीजे अकिल यांची मालमत्ता सक्तवसूली संचलनालयाने (ED) जप्त केली आहे. गुजरातमधील संदेसरा बंधूंची फार्मास्युटिकल कंपनी स्टर्लिंग बायोटेक ग्रुपशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी मालमत्ता जप्त केल्याचे ED च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.Sterling-Biotech fraud case; Enforcement Directorate (ED) has provisionally attached movable & immovable properties worth Rs. 8.79 Crore under PMLA in Sandesara Group case. With this attachment, ED

    इरफान अहमद सिद्दीकी (२.४१ कोटी रूपये), संजय खान (३ कोटी रूपये), दिनो मोरिया (१.४० कोटी रूपये) आणि डीजे अकील अब्दुलखली बच्चुअली (१.९८ कोटी रूपये) एवढी मालमत्ता ED ने जप्त केली आहे. संदेसरांच्या स्टर्लिंग बायोटेक ग्रुपशी संबंधित घोटाळ्यात आत्तापर्यंत एकूण १४,५२१.८० कोटी रूपयांची मालमत्ता ED ने जप्त केली आहे.



    दिनो मोरिया आणि डीजे अकील यांना 2011 आणि 2012 दरम्यान पैसे देण्यात आले होते. हे दोघेही संदेसरा बंधूंनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. दिनो मोरिया आणि डीजे अकील यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काही लाख रुपये देण्यात आले होते.

    संदेसरा बंधूंच्या कंपनीने बँकेच्या फसवणुकीतून मिळविलेल्या पैशांमधून हे पैसे दिनो मोरिया यांना दिले होते. त्यामुळे ही गुन्ह्यातील रक्कम ठरते असे ईडीचे म्हणणे आहे. संदेसरा हे गुजरातमधील फार्मास्युटिकल कंपनीचे संचालक आणि मालक आहेत.

    स्टर्लिंग बायोटेक समूहाचे फरारी संचालक नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी या गुन्ह्यातून मिळवलेली रक्कम जावई इरफान सिद्दीकी, अभिनेता संजय खान, अभिनेता दिनो मोरिया आणि डीजे अकिल या चौघांना दिली. मात्र, नितिन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना विशेष कोर्टाने फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर केले आहे.

    Sterling-Biotech fraud case; Enforcement Directorate (ED) has provisionally attached movable & immovable properties worth Rs. 8.79 Crore under PMLA in Sandesara Group case. With this attachment, ED

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य