• Download App
    मोदींबरोबरच्या १० राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन संवादानंतर ममता बॅनर्जी भडकल्या; मुख्यमंत्र्यांना बोलू न दिल्याचा दावा states were not allowed to speak why were they called. All the Chief Ministers must protest for not being allowed to speak

    मोदींबरोबरच्या १० राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन संवादानंतर ममता बॅनर्जी भडकल्या; मुख्यमंत्र्यांना बोलू न दिल्याचा दावा

    वृत्तसंस्था

    कोलकाता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूर्वोत्तर १० राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील आपले मनोगत मांडले पण या संवादात मुख्यमंत्र्यांना बोलू दिले नाही, असा कांगावा करीत ममतांनी नंतर मोदींच्या नावाने आगपाखड केली. states were not allowed to speak why were they called. All the Chief Ministers must protest for not being allowed to speak

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे विविध राज्यांमधल्या अधिकारी, डॉक्टरर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी संवाद साधत आहेत. या साखळीत आज पूर्वेकडच्या १० राज्यांच्या अधिकाऱ्यांशी मोदींनी संवाद साधला. यामध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला. यात ममता बॅनर्जी यांचा समावेश होता.

    पश्चिम बंगालमध्ये लसीकरणाचे प्रमाण सध्या कमी असले, तरी राज्यात कोविड नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या संवाद बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी मोदींवर आगपाखड केली. त्या म्हणाल्या, जर पंतप्रधान एकतर्फी संवाद साधतात. ते आमच्याशी बोलत नाहीत. जर आमच्याशी बोलायचेच नाही, तर मुख्यमंत्र्यांना अशा बैठकांना ते बोलावतातच का, असा सवाल ममतांनी केला.



    वास्तविक ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत आपले मनोगत व्यक्त केले होते. पण फक्त पंतप्रधान आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांचीच छोटेखानी भाषणे झाली, असा दावा ममतांनी केला. हा आमचा अपमान आहे. पश्चिम बंगालसाठी मला लसीचा अतिरिक्त साठा मागवायचा होता. पण आम्हाला बोलूच दिले नाही, असा दावाही त्यांनी केला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एवढे असुरक्षित वाटतेय, की ते आमचे ऐकूनही घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. देशातली कोविड आकडेवारी कमी झाल्याचा दावा ते करतात. पण अनेक राज्यांमध्ये कोविड वाढताना दिसतो आहे, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोपही ममतांनी केला.

     

    states were not allowed to speak why were they called. All the Chief Ministers must protest for not being allowed to speak

    Related posts

    yogi-adityanath : ‘आम्ही कुणालाही छेडणार नाही, पण जर का कुणी आम्हाला छेडलंच तर…’

    Turkey and Azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानचे नापाक कृत्य, पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे भारतीयांकडून पर्यटनावर बहिष्कार

    United nations : भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर संयुक्त राष्ट्राकडून आली पहिली प्रतिक्रिया, म्हटले…