विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्टेट बँकेने (एसबीआय) प्रोबेशनल अधिकारी पदासाठी जागा भरण्याची अधिसूचना काढली आहे. एकूण ६०६ अधिकाºयांच्या पदाची भरती होणार आहे. State Bank will be recruiting for 606 posts, an opportunity to work as an officer
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 28 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसबीआय डॉट कॉमवर वर एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. बँकेची परीक्षा 15 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येईल.
स्टेट बँक आॅफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट कॅडर आॅफिसर रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 आॅक्टोबर 2021 आहे. नोंदणी शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख देखील 18 आॅक्टोबर आहे. बँकेच्या सुचनेनुसार, या परीक्षेचे प्रवेशपत्र 3 नोव्हेंबर रोजी जारी केले जाईल.
एकूण रिक्त पदे – ६०६
- रिलेशनशिप मॅनेजर – ३१४ जागा
- रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड – २० जागा
- ग्राहक संबंध कार्यकारी – २१७ जागा
- गुंतवणूक अधिकारी – १२ जागा
- केंद्रीय संशोधन संघ – २ जागा
- मार्केटिंग – १२जागा
- उपव्यवस्थापक मार्केटिंग – २६ जागा
असा करा अर्ज
सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा
येथे वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर दिलेल्या Latest Announcements लिंकवर क्लिक करा.
आता RECRUITMENT of SPECIALIST CADRE OFFICERS REGULAR/CONTRACT BASIS च्या लिंकवर जा.
येथे विचारलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
नोंदणी केल्यानंतर अर्ज भरा.
त्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.
State Bank will be recruiting for 606 posts, an opportunity to work as an officer
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन वाझे याची होणार तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात रवानगी; घरीच नजरकैदेत ठेवण्याचे अपील फेटाळले
- नाही – नाही म्हणत कॅप्टन साहेब पोहोचले अमित शहांकडे; पंजाबच्या राजकीय भूकंपाचा तिसरा अंक सुरू
- तिकडे पंजाब काँग्रेसमध्ये मानापमान, तर इकडे कॅप्टन दिल्लीत अमित शहांच्या भेटीला, पक्ष प्रवेशावर चर्चा?
- भाजप किसान मोर्चा साखर संकुलवर धडकला एकरकमी FRP देण्याची आग्रही मागणी