• Download App
    Sputnik Lite : स्पुतनिकच्या सिंगल डोस व्हॅक्सिनची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात । Sputnik Lite Sputnik single dose covid-19 vaccine human trial in final stages

    Sputnik Lite : स्पुतनिकच्या सिंगल डोस व्हॅक्सिनची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात

    Sputnik Lite : भारताताील रशियाचे उपराजदूत रोमन बाबुश्किन म्हणाले की, कोरोना लस स्पुतनिक लाइटच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. कोरोनाविरुद्ध स्पुतनिकच्या सिंगल डोस लसीचे नाव स्पुतनिक लाइट आहे. वृत्तसंस्थेला ते म्हणाले की, स्पुतनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. आम्हाला विश्वास आहे की, लसीचे उत्पादन येथे होईल, कारण कमी काळात औषध निर्मितीच्या संदर्भात भारत जगातला अग्रणी देश आहे. Sputnik Lite Sputnik single dose covid-19 vaccine human trial in final stages


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताताील रशियाचे उपराजदूत रोमन बाबुश्किन म्हणाले की, कोरोना लस स्पुतनिक लाइटच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. कोरोनाविरुद्ध स्पुतनिकच्या सिंगल डोस लसीचे नाव स्पुतनिक लाइट आहे. वृत्तसंस्थेला ते म्हणाले की, स्पुतनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. आम्हाला विश्वास आहे की, लसीचे उत्पादन येथे होईल, कारण कमी काळात औषध निर्मितीच्या संदर्भात भारत जगातला अग्रणी देश आहे.

    स्पुतनिकचा भारताशी करार

    त्यांनी भारताच्या लस उत्पादन क्षमतेचे कौतुक केले. तसेच स्पुतनिक-व्ही या लसीचा पुरवठा हा करार व वेळापत्रकानुसार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. उपराजदूत म्हणाले, “आम्हाला इतर कंपन्या आणि भारत सरकारच्या राज्य सरकारांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. या प्रस्तावांचा काळजीपूर्वक अभ्यास केला जात आहे.” सोमवारी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनासिया बायोटेक यांनी स्पुतनिक-व्हीवरील लस तयार करण्यास सुरुवात केली.

    भारतात लवकरच उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा

    पॅनेसिया बायोटेक ही भारतीय भागीदारांपैकी एक आहे. प्रारंभिक वेळापत्रकानुसार हळूहळू दरवर्षी भारतात 850 दशलक्ष डोस करण्याचे आहे. उपराजदूत म्हणाले, “आम्हाला माहिती आहे की इतर व्यावसायिक भागीदारांनी आणि राज्य सरकारांनीही त्यात रस दाखविला आहे. आम्ही सर्व प्रस्तावांचा अगदी काळजीपूर्वक अभ्यास करत आहोत.” रशियाची स्पुतनिक-व्ही लस लसीकरण मोहिमेसाठी भारताने मंजूर केलेल्या तीन लसींपैकी एक आहे. स्पुतनिकने डॉ. रेड्डीज लॅबशी करार केला आहे. आतापर्यंत, स्पुतनिक लसीच्या दोन खेप भारतात आल्या आहेत. पहिली तुकडी 1 मे रोजी आली आणि दुसरी 16 मे रोजी आली आहे.

    Sputnik Lite Sputnik single dose covid-19 vaccine human trial in final stages

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!