वृत्तसंस्था
हैदराबाद : रशियाच्या स्पुटनिक-5 लसीच्या डोसची किंमत ९९५.४० रुपये प्रति डोस आहे.हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुटनिक-५ लस भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे. ही किंमत केवळ आयात केलेल्या लसींना लागू आहे. Sputnik-5 vaccine costs Rs 995 per dose
भारतात या लसीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर किंमती कमी होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. सध्या जीएसटी जोडून कमी किंमत आम्ही ठेवली आहे, असे रेड्डी लॅब्सने स्पष्ट केले.
स्पुटनिक-५ ही लस कोरोना विषाणुच्या लढ्यात 91.6 टक्के कार्यक्षम आहे. कोरिया, ब्राझील आणि चीनसारख्या इतर देशांमध्ये उत्पादन सुरू झाले आहे. 11 ऑगस्ट रोजी जगातील प्रथम कोविड – 19 लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश ठरला होता. भारतात याची चाचणी आणि वितरण करण्याचे हक्क डॉ. रेड्डीज लॅबने घेतले आहेत.
गेल्या सप्टेंबरमध्येच रेड्डी लॅब्सने लसीच्या चाचणी आणि वितरणाचा करार केला होता. सध्या लसीचे १ लाख ५० हजार डोस मिळाले आहेत. आज या लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये दिला. या लसींची दुसरी खेप आज भारतात दाखल होणार आहे.
Sputnik-5 vaccine costs Rs 995 per dose
महत्त्वाच्या बातम्या
- आमने-सामने : इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्षावरून कंगना रनौत आणि इरफान पठाण भिडले , कंगनाने करून दिली बंगालमधील हिंसाचाराची आठवण!
- भारत कोरोनापेक्षा “गिधाडी पत्रकारितेचा” बळी ठरतोय; ऑस्ट्रेलियन मीडियाने पाडले पितळ उघडे
- ‘योगी जी, जिवंत राहिलो तर कोविड रूग्णांना पुन्हा सेवा देईन; मेलोच तर तुम्हाला भेटण्यासाठी पुनर्जन्म घेईन..’