• Download App
    समाजवादीच्या यादीत गुंड माफियांचा भरणा; केशव प्रसाद मौर्य यांचा हल्लाबोल SP's list of candidates is trailer of pre-2017 days of Western UP with Akhilesh suggesting that they can't leave rioters

    भाजप नेत्यांचे मौन सुटले : समाजवादीच्या यादीत गुंड माफियांचा भरणा; केशव प्रसाद मौर्य यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    लखनऊ : भाजपमधून उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गळती सुरू असताना मौन बाळगून बसलेले भाजपचे नेते आज बोलू लागले आहेत. आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वंशवाद आणि परिवार वाद चालवणारे नेते सामाजिक न्यायाची लढाई लढू शकत नाहीत, असा हल्लाबोल केला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीवर तिखट हल्ला चढवला आहे.SP’s list of candidates is trailer of pre-2017 days of Western UP with Akhilesh suggesting that they can’t leave rioters

    लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना केशव प्रसाद मौर्य म्हणाले, की समाजवादी पक्षाची पहिली यादी पाहिली की त्यामध्ये अखिलेश यादव यांच्या 2017 पूर्वीच्या राजवटीची झलक पाहायला मिळते. त्यांच्या पहिल्या यादीतच गुंड माफियांना तिकीटे देण्यात आली आहेत. ज्यांच्यावर 30-40 खटले सुरू आहेत ते गुंड माफिया हे समाजवादी पक्षाच्या उमेदवार यादीत सामील आहेत.

    2017 पूर्वी समाजवादी पक्षाच्या राजवटीत माफिया मोकाट सुटले होते. कैराना मधून पलायन सुरू होते. मुजफ्फरनगर सारखे दंगे भडकवले जात होते. अखिलेश यादव यांना तीच राजवट परत आणायची आहे. गुंड माफिया यांच्या शिवाय समाजवादी पार्टी चालू शकत नाही असेच अखिलेश यादव यांनी दाखवून दिले आहे. पहिल्याच यादीत याची झलक मिळत असेल तर आणखी किती गुंडा माफी यांना अखिलेश यादव तिकीट वाटप करणार आहेत? असा खोचक सवालही केशव प्रसाद मौर्य यांनी केला आहे.

    त्याच वेळी स्वामी प्रसाद मौर्य आणि भाजप सोडून गेलेले अन्य नेत्यांवर टीका करण्याचे सध्यातरी केशव प्रसाद मौर्य यांनी टाळल्याचे दिसत आहे. केशव प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप सोडून गेलेल्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता जे नेते परिवार वाद आणि वंशवादाचे राजकारण करतात ते सामाजिक न्यायाची खरी लढाई लढू शकत नाहीत, असे टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाला त्यांच्या पहिल्या उमेदवार यादी वरून घेरले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भाजपमधून गळती सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी प्रथमच बोलले आहेत.

    SP’s list of candidates is trailer of pre-2017 days of Western UP with Akhilesh suggesting that they can’t leave rioters

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!