• Download App
    जम्मू-काश्मीर काँग्रेसमध्ये फूट; गुलाम नबी आझादांच्या अनेक समर्थकांचे राजीनामे । Split in Jammu and Kashmir Congress; Many supporters of Ghulam Nabi Azad resign

    जम्मू-काश्मीर काँग्रेसमध्ये फूट; गुलाम नबी आझादांच्या अनेक समर्थकांचे राजीनामे

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : एकीकडे शरद पवारांनी आजच दिल्लीमध्ये काँग्रेस फोडून विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लावले असताना तिकडे जम्मू-काश्मीरच्या काँग्रेस प्रत्येक शाखेत फूट पडली आहे. योगानंद शास्त्री हे जसे जी – 23 गटाचे नेते होते, तसेच जी – 23 गटाचे प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांच्या अनेक समर्थकांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपले राजीनामे पाठवून दिले आहेत. Split in Jammu and Kashmir Congress; Many supporters of Ghulam Nabi Azad resign

    यामध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अनेक माजी आमदार यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे या सर्वांची तक्रार केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेश नेतृत्व या दोन्हींच्या विरोधात आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करून घेण्यासाठी काँग्रेस पुरेशा सामर्थ्याने आंदोलन करत नाही. त्याला केंद्रीय नेतृत्व पुरेसे बळ देत नाही, असा आरोप गुलाम नबी आझाद यांच्या समर्थकांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुलाम मोहम्मद मीर यांच्या विरोधात देखील या सर्व नेत्यांनी तक्रारी केल्या आहेत.

    काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या नेत्यांमध्ये जी. एम. सरूरी, गुलाम नबी मोंगा, अन्वर बट्ट, मनोहर लाल शर्मा, जुगल किशोर शर्मा, सुभाष गुप्ता आदी नेत्यांचा समावेश आहे. काश्मीरमध्ये 200 कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याचा दावा देखील या नेत्यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

    एकीकडे शरद पवार संसदेत सर्व विरोधकांचे ऐक्य घडवण्यासाठी दिल्लीत आजपासूनच मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांनी योगानंद शास्त्री यांना राष्ट्रवादीत सामील करून काँग्रेसमध्ये फूट पाडली आहे. त्याच वेळी जम्मू-काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांच्या गटाच्या नेत्यांनी काँग्रेसचे राजीनामे दिले आहेत यातून खऱ्या अर्थाने विरोधकांचे ऐक्य कसे साधले जाणार?, या विषयावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

    Split in Jammu and Kashmir Congress; Many supporters of Ghulam Nabi Azad resign

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट