वृत्तसंस्था
नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवारी वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक वीक समारंभाच्या उद्घाटनात 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांच्या विशेष मालिका जारी केली आहे. ही नाण्यांची विशेष मालिका काही व्यक्तींसाठी खास असणार असल्याची माहिती पीएमओने दिली आहे. special series of coins have the theme of the logo of Azadi Ka Amrit Mahotsav
– काय म्हटलंय पीएमओने?
पीएमओने एक निवेदन जारी केले आहे, त्यामध्ये असे म्हटले की, पंतप्रधानांनी 6 जून 2022 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक वीक समारंभाचे उद्घाटन समारंभात 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची विशेष मालिका जारी केली आहे. नाण्यांची ही विशेष मालिका दृष्टिहीन व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार असून त्यांना ही नाणी सहज ओळखणे शक्य होणार आहे.
– नाण्यांची ‘ही’ आहेत वैशिष्ट्य
या नाण्यांच्या विशेष मालिकेअंतर्गत या नाण्यांवर “आझादी का अमृत महोत्सव” AKAM चा लोगो असेल. पीएमओच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘नाण्यांच्या या विशेष मालिकांमध्ये AKAM च्या लोगोची थीम असेल. यामुळे दृष्टिहीन व्यक्तींना देखील सहज ओळखता येणार आहे. त्यामुळे ही नाण्यांची खास वैशिष्ट्य असल्याचे म्हटले जात आहे. हा आठवडा 6 ते 11 जून 2022 या कालावधीत ‘आझादी का अमृत महोत्सव’ (AKAM) चा भाग म्हणून साजरा केला जात आहे.
special series of coins have the theme of the logo of Azadi Ka Amrit Mahotsav
महत्वाच्या बातम्या
- चीन बांधतोय स्वतःचे अंतराळ स्थानक : काम पूर्ण करण्यासाठी स्पेसमध्ये पाठवले 3 अंतराळवीर
- अरबस्तानात घृणास्पद कृत्य : मोदींचा फोटो कचराकुंडीवर; देशभर संताप!!
- खलिस्तानवाद्यांचे डोके वर : सुवर्ण मंदिराबाहेर खलिस्तान समर्थनात घोषणाबाजी; अमृतसरमध्ये तणाव