वृत्तसंस्था
तिरुपती : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपतीच्या दर्शनासाठी लाखो लोक जातात. आता देवस्थान समितीतर्फे ३०० रुपयांचा विशेष पास भाविकांना देण्यात येत आहे. दर्शनासाठी ऑनलाइन तिकीट विक्री सुरू झाली आहे. Special entrance pass of Rs. 300 for darshan at Tirupati temple; Online ticket booking service also launched
तिरुमला तिरुपती देवस्थान यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी ३०० रुपयांच्या विशेष प्रवेश पासचा कोटा जाहिर केला आहे.तिकिटांचा ऑनलाइन कोटा शुक्रवारी (ता.२२ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला. नोव्हेंबर महिन्यातील ऑनलाइन पास बूकिंग शनिवारी (ता.२३ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता ऑनलाइन पद्धतीने सुरू केली जाईल. पण, किती कोटा दिला जाईल, हे जाहीर केलेले नाही.
सर्व नियमांचे पालन करून तिरूपती मंदिराला दर्शनला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढवण्याचा दबाव तिरुमला तिरुपती देवस्थान संस्थेवर आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोना रिपोर्टसोबत ठेवावा लागेल तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्याना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. सध्या तिरूपती मंदिरात दररोज ३०,००० भाविक दर्शनासाठी येत आहेत. कोरान काळाच्या आधी तिरूपती मंदिरात अंदाजे ८० हजार भाविक दर्शनासाठी येत होते.
ऑनलाइन बुकिंग कसे करायचे ?
तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची अधिकृत वेबसाइटच्या संकेतस्थळ ओपन करा. नंतर त्यामध्ये मोबाईल नंबर, कॅप्चा कोड भरा. जनरेट ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला सहा अंकी ओटीपी भरा.त्यानंतर ‘लॉगिन’ वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कॅलेंडर दिसेल. त्यामध्ये बुकिंग डेट सिलेक्ट करा. त्यानंतर तिथे दिसणारा अर्ज भरा.
Special entrance pass of Rs. 300 for darshan at Tirupati temple; Online ticket booking service also launched
महत्त्वाच्या बातम्या
- IND vs PAK: महान सामन्यात हे पाच मोठे विक्रम होऊ शकतात, कोहली, रोहित आणि बुमराहलाही इतिहास रचण्याची संधी
- गोपीचंद पडळकर यांचं मोठं विधान ; म्हणाले – भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल
- १००% लसीकरणासाठी नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावाने लढविली आयडियेची कल्पना!!
- निजामशाहीची पालखी वाहण्यात मोठा आनंद; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका