प्रतिनिधी
मुंबई : आजारपणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळ अधिवेश हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिले. पण काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांना फोन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत चर्चा केली. Speaker to elect Sonia Gandhi by phone
परवा दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली होती. काल सत्ताधारी महाविकास आघाडीचा चहापानाला मात्र ते उपस्थित नव्हते. त्याचप्रमाणे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज ते हजर नव्हतेच, परंतु काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून विधानसभा अध्यक्षपदाबाबत त्यांच्याशी चर्चा केली, असे नवी दिल्लीतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आयबीएन लोकमतने ही बातमी दिली आहे.
मुख्यमंत्री तब्येतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहत असतील तर त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. परंतु त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा सारख्या महत्त्वाच्या पदाचे काम अङता कामा नये. कामाच्या जबाबदारीचे वाटप व्यवस्थित व्हावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री जरी विधिमंडळ कामकाजात सहभागी झाले नसले तरी त्यांनी सोनिया गांधी यांचा फोन आल्यानंतर त्यांच्याशी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत चर्चा केली असे समजते. विधानसभेचे अध्यक्ष आवाजी मतदानाने निवडायचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी मधील विसंगतीवर टीका केली आहे. आघाडीतल्या पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाहीच पण आपापल्या पक्षातल्या आमदारांवर देखील पक्ष नेत्यांचा विश्वास उरलेला नाही. म्हणूनच ते आवाजी मतदानाने नियमबाह्य पद्धतीने विधानसभा अध्यक्ष निवडत आहेत अशी टीका फडणवीस यांनी केली.
सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेचे अध्यक्षपदाबाबत जी चर्चा झाली त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुण्यातील पुणे जिल्ह्यातील भोरचे वरिष्ठ आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा झाल्याचे समजते. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नावांबाबत चर्चा झाल्याचा इन्कार केला आहे. ज्या दिवशी नावांवर चर्चा होईल, त्या दिवशी ती माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात येईल, असे ते दिल्लीत म्हणाले.
परंतु काही असले तरी उद्धव ठाकरे आज तब्येतीच्या कारणास्तव दिवसभर विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले नाहीत. मात्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.