वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील कोरोना आणि ओमायक्रोन साथीची भीती लक्षात घेता उत्तर प्रदेश सह पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी सूचना अलाहाबाद हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला केली आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमधून टीकाटिपणी होत असून समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी अलाहाबाद हायकोर्टावर टीकास्त्र सोडले आहे.SP MP Ramgopal yadav targets Allahabad high court
हायकोर्टात बसलेले लोक स्वतःला वाटेल तसे निर्णय देत असतात. वास्तविक पाहता निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी कोणत्याही पक्षाने केलेली नाही. तरी देखील स्वतःच्या मनासारखे हायकोर्ट निर्णय देत असेल तर सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी खासदार रामगोपाल यादव यांनी केली आहे.
अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली असून कदाचित केंद्र सरकार उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावेल आणि सप्टेंबर मध्ये विधानसभा निवडणूक घेईल, अशा आशयाचे ट्विट खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
राम गोपाल यादव आणि सुब्रमण्यम स्वामी या दोन खासदारांच्या टीकाटिप्पणी नंतर सोशल मीडियात देखील निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरून जोरदार घमासान सुरू झाले आहे. समाजवादी पक्ष तसेच काँग्रेस समर्थकांनी भाजप नेतृत्वावर कटाक्ष केला आहे. हायकोर्टाच्या साथीने भाजप आपला पराभव पुढे ढकलत असल्याची टीका सोशल मीडियातून होताना दिसत आहे.
SP MP Ramgopal yadav targets Allahabad high court
महत्त्वाच्या बातम्या
- Night Curfew : ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे यूपीत नाईट कर्फ्यूची घोषणा, लग्नासाठी 200 जणांना परवानगी, 25 डिसेंबरपासून निर्बंध लागू
- मोठी बातमी : अमेरिकेतील H-1B आणि इतर वर्क व्हिसा अर्जदारांना 2022 मध्ये मुलाखतीतून सूट, भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा वेळ होणार कमी
- धक्कादायक : राज्यात मागच्या ५ महिन्यांत १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य सरकारची सभागृहात माहिती