विशेष प्रतिनिधी
लखनऊ : गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकती सपाटून मार खाल्यावर आता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षानेही आता हिंदूत्वाचा अजेंडा पुढे रेटण्यास सुरूवात केली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री पर्यटन योजनेत ३७३ प्रस्ताव आले आहेत. यामध्ये सपा अणि बसपाच्या आमदारांनीही मंदिराच्या विकासाचेच प्रस्ताव दिले आहेत.SP, BSP MLAs also have Hindutva agenda, proposals for development of most temples for tourism promotion
उत्तर प्रदेशात मोठ्या संख्येने मुस्लिम लोकसंख्या आहे. हजारो मशीदी आणि सुफी दर्गे आहेत. मात्र, सपा आणि बसपाच्या आमदारांनीही त्यांच्या विकासाचे प्रस्ताव दिलेले नाहीत. विशेष म्हणजे मुस्लिम अनुनय करणाºया समाजवादी पक्षाच्य मुस्लिम आमदारांनीही हिंदू मंदिरांच्या विकासाचे प्रस्ताव दिले आहेत. याउलट चंदौली येथील सूफी संत लतीफ शाह दर्ग्याच्या विकासाचा प्रस्ताव दिला आहे.
उत्तर प्रदेशात भाजपने आक्रमकपणे हिंदूत्वाचा अजेंडा रबविला आहे. विरोधी पक्षावर मुस्लिम तृष्टीकरणाचा आरोप केला आहे. त्यामुळे जातीय ध्रुवीकरणाची भीती सपा आणि बसपाचा वाटत आहे. त्यामुळे आपल्यावरील मुस्लिम अनुनयाचा आरोप खोडून काढण्यासाठी हिंदू मंदिरांचा पुळका आला आहे. एका अर्थाने सॉफ्ट हिंदूत्वाकडे हे दोन्ही पक्ष वळले आहेत.
उत्तर प्रदेशात ४०३ आमदार आहेत. पर्यटन विभागाला ३७३ प्रस्ताव आत्तापर्यंत प्राप्त झाले आहेत. यामध्ये स्थानिक वारसा आणि पर्यटन स्थळे, अध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि धार्मिक महत्त्वाची क केंद्रे विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संवर्धन योजना सुरू केली आहे.
पर्यटन विभागाच्या अहवालानुसार बहुसंख्य आमदारांनी हिंदू धर्माशी संबंधित स्थळे निवडली आहेत. आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील महत्वाची स्थळे नामांकित करण्यास सांगितले होते. त्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघाला ५० लाखांची रक्कम देण्यात येणार आहे. अतिरिक्त निधी आमदार निधी आणि सीएसआर फंडातून मिळविला जाईल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ही योजना सर्व धर्म आणि वारसा स्थळांसाठी खुली असताना, बहुतांश आमदारांनी मंदिर विकासाचे प्रस्ताव दिले असल्याचा आनंद आहे. मात्र, एखाद्या मुस्लिम आमदाराने दर्ग्याच्या विकासासाठी प्रस्ताव दिला असेल तर तेथेही निधी दिला गेल असता. परंतु, आता समाजवादी पक्षाचे लोकही दर्गा किंवा मशिदीऐवजी मंदिरांना प्राधान्य देत आहेत.
सपाच्या 33 आमदारांपैकी या योजनेअंतर्गत स्थळे प्रस्तावित केली होती, त्यापैकी 29 हिंदू मंदिरे आणि आश्रम तसेच स्थानिक हिंदू देवता, देवी आणि बाबांना समर्पित स्थळे निवडली. उर्वरित चार जणांनी एक किल्ला, एक दर्गा, एक गुरुद्वाराचे नाव दिले आहे.
SP, BSP MLAs also have Hindutva agenda, proposals for development of most temples for tourism promotion
- छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे वडील म्हणतात ब्राम्हणांवर बहिष्कार टाका, पोलीसांनी दाखल केला गुन्हा
- South Africa Riots : दक्षिण आफ्रिकेत भारतवंशीयांकडून भयंकर हिंसाचार, डझनभर कृष्णवर्णीयांचा मृत्यू
- पवारांनी कुठे पाठीत खंजीर खुपसला दाखवा?, असे म्हणणाऱ्या संजय राऊतांना चंद्रकांतदादांचा “या” अभ्यासाचा सल्ला