• Download App
    इस्लामी हमासच्या दहशतवादी हल्ल्यात केरळच्या सौम्या संतोष यांनी प्राण गमावले; इस्त्रायली सरकारकडून गंभीर दखल Soumya Santosh, who hailed from Idukki and worked as a caregiver in Israel, was killed in rocket launches on Israel by Palestine

    इस्लामी हमासच्या दहशतवादी हल्ल्यात केरळच्या सौम्या संतोष यांनी प्राण गमावले; इस्त्रायली सरकारकडून गंभीर दखल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेने इस्त्रालयमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात मूळते केरळमधले केअर टेकर सौम्या संतोष यांनी प्राण गमावले आहेत. या हल्ल्याची इस्त्रायलने गंभीर दखल घेतली असून सौम्या संतोष यांच्या परिवाराशी इस्त्रायली राजदूतांनी संपर्कही साधला आहे. Soumya Santosh, who hailed from Idukki and worked as a caregiver in Israel, was killed in rocket launches on Israel by Palestine

    बुधवारी पहाटे हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या दक्षिण आणि मध्य भागात रॉकेट हल्ले केले. यामुळे लागलेल्या आगीत प्रचंड वित्तहानी झाली असून मनुष्यहानीचा अंदाज घेतला जात आहे. रॉकेट हल्ल्यांपासून वाचण्यासाठी हजारो लोकांनी तेल अवीव येथून बेरशेबा येथील बॉम्ब-आश्रयस्थळाकडे धाव घेतली आहे.



    इस्रायल संरक्षण दलाने गाझामधील एक इमारत उध्वस्त केल्याने आणि हमासच्या दोन ज्येष्ठ दहशतवाद्यांना ठार केल्याची प्रतिक्रिया म्हणून हमासने इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले सुरू केले. याच हल्ल्यात सौम्या संतोष यांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलचे भारतातील राजदूत रॉन मालका यांनी सौम्या संतोष यांच्या परिवाराशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले.

    सौम्या संतोष मूळच्या केरळच्या इडूकीमधल्या. त्यांचा परिवार तेथे राहतो. सौम्या संतोष यांच्यामागे पती आणि ९ वर्षांचा मुलगा आहे. हा मुलगा आता आईच्या मायेविना वाढेल. संपूर्ण इस्त्रायल सौम्या संतोष यांच्या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही राजदूत रॉन मालका यांनी दिली आहे.

    Soumya Santosh, who hailed from Idukki and worked as a caregiver in Israel, was killed in rocket launches on Israel by Palestine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य