• Download App
    पुढील महिन्यापासून भारत पुन्हा सुरू करणार कोविंद लसींची निर्यात, केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांचे विधान | Soon india will resume export and donations of surplus covid vaccines

    पुढील महिन्यापासून भारत पुन्हा सुरू करणार कोविड लसींची निर्यात, केंद्रीय आरोग्यमंत्री मंडाविया यांचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी दिलेल्या आपल्या वक्तव्यात कोविड लसीच्या निर्यातीसंबंधी एक माहिती जाहीर केली आहे. पुढील महिन्यांपासून भारत कोविड लसीची निर्यात आणि देणगी पुन्हा सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये जो बायडन व्हॅक्सिन्स निर्यातीचा मुद्दा उपस्थित करण्याची दाट शक्यता होती. ही शक्यता लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी ही घोषणा करण्यात आली आहे.

    Soon india will resume export and donations of surplus covid vaccines

    भारत हा जगातील सर्वात जास्त व्हॅक्सिन निर्मिती करणारा देश आहे. भारतातील करोडो लोकांना याचा लाभ घेता यावा यादृष्टीने, एप्रिल महिन्यांपासून भारताने वॅक्सिनची निर्यात बंद केली होती. भारतातील जवळजवळ ९५ करोडो लोकांना डिसेंबरपर्यंत व्हॅक्सिन मिळवून देणे हे सरकारचे धोरण होते. हे धोरण जर पूर्ण केले असते तर भारतीय लोकसंख्येच्या  ६१% जनतेचे व्हॅक्सिनेशन पूर्ण झाले असते.


    Mansukh Mandaviya Profile : कोण आहेत मनसुख मंडाविया, हर्षवर्धन यांच्या जागी बनले आरोग्यमंत्री, असा आहे राजकीय प्रवास


    भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांची शिखर परिषदेची सुरुवात अमेरिकेमध्ये उद्यापासून होणार आहे. नवीन निर्यात धोरणानुसार ‘व्हॅक्सिन मैत्री’ या प्रकल्पा अंतर्गत भारत शेजारच्या देशांना कोवॅक्स ही लस पुरविणार आहे, असे देखील मांडविया यांनी यावेळी सांगितले.

    एप्रिलमध्ये वॅक्सिनच्या निर्यातीवर बंदी येण्याच्या आधी भारताने जवळपास ६.६ करोड लसीचे डोस इतर देशांना पुरवले होते. नवीन धोरणानुसार भारतीय कंपन्यांनी जवळजवळ ३०० करोड कोविड व्हॅक्सिन्स एका वर्षात   बनवण्याचा निर्धार केला आहे.

    Soon india will resume export and donations of surplus covid vaccines

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक