बॉलीवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. अभिनेता सोनू सूदने रविवारी मोगा येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, ती कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पत्रकार परिषदेत सोनू सूदने राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले. Sonu Sood Sister Malvika To Contest Punjab Assembly Elections 2022
वृत्तसंस्था
चंदिगड : बॉलीवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. अभिनेता सोनू सूदने रविवारी मोगा येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, ती कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पत्रकार परिषदेत सोनू सूदने राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले. सोनू सूदने अलीकडेच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली आहे.
कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही
पत्रकार परिषदेत सोनू सूद म्हणाला की, मी सध्या कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. बहिणीच्या मनात असेल तर त्या मोगामधून विधानसभा निवडणूक लढवतील. मात्र, ती कोणत्या पक्षातून लढणार हे निश्चित झालेले नाही. ते वेळ आल्यावर कळेल.
मी कोणाच्याही विरोधात प्रचार करणार नाही
सोनू सूद म्हणाला की, मी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याविरोधात प्रचार करणार नाही. कोणत्याही पक्षाचा स्टार प्रचारक होण्यासही त्याने नकार दिला. मात्र, तो त्याची बहीण मालविकाला प्रमोट करणार आहे. सोनू सूद म्हणाला की, मी कोणत्याही पक्ष किंवा नेत्याविरोधात काहीही बोलणार नाही.
नेत्यांनीही त्यांच्या जाहीरनाम्याशी करार करायला हवा, असे सोनू सूद म्हणााे. करारानुसार आश्वासने वेळेत पूर्ण न झाल्यास राजीनामा देण्याची व्यवस्था असावी. सोनू सूदची बहीण मालविका सध्या मोगामध्ये खूप सक्रिय आहे. राजकारणात येण्याचे मुख्य उद्दिष्ट जनतेची सेवा करणे हे असल्याचे सूद म्हणाला.
Sonu Sood Sister Malvika To Contest Punjab Assembly Elections 2022
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी