विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पऱखड शब्दांमध्ये सोशल मीडियावरील स्वयंघोषित फॅक्ट चेकर्सवर तिखट प्रहार केला. आज तक वाहिनीवर बोलताना रविशंकर प्रसाद यांनी या स्वयंघोषित फॅक्ट चेकर्सचा मोदी व्देषाच्या अजेंड्याचीही पुरती पोलखोल केली. Social media companies already have appointed fact checkers. Who are these fact-checkers and how are they appointed
रविशंकर प्रसाद म्हणाले, की मेन स्ट्रीम माध्यमे कधीतरी हे तपासणार आहेत की नाही, हे फॅक्ट चेकर्स आहेत तरी कोण… ते नेमतेय कोण… त्यांच्या नेमणूकीची काही कायदेशीर प्रक्रिया आहे की नाही… त्यांची नावे सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध नाहीत. त्यांना फॅक्ट चेक करण्याचा अधिकार कोणी दिला याची अधिकृत माहिती ते देत नाहीत… मला काही माहिती मिळाली आहे. मी आणखीही माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतोय. पण काही फॅक्ट चेकर्सचा हा अजेंडाच राहिला आहे, की मोदींचा व्देष करा. टीका नव्हे, तर व्देष करा. त्यांच्याविषयी वाट्टेल ते खोटे नाटे पसरवा. काही फॅक्ट चेकर्संचा तर देश तोडण्याचाच अजेंडा आहे.
आपल्या १३० कोटींच्या देशात स्वतंत्र, निःपक्ष फॅक्ट चेकर्स मिळतच नाहीत का… एखादी नफा कमवणारी खासगी कंपनी उठते आणि आम्हाला मतस्वातंत्र्याचे धडे देते. आम्हाला काही कळत नाही का… आम्ही त्यांना सांगितले, तुम्ही भारताततल्या कायद्याचे पालन करा. यात कोणती गैर भूमिका आहे. मेन स्ट्रीम मीडियाला या कथित फॅक्ट चेकर्सबद्दल काही गैर वाटत नाही का… या फॅक्ट चेकर्सवर कोणी सवाल उपस्थित करायचे नाहीत का, असे परखड मुद्दे रविशंकर प्रसाद यांनी मांडले.
आज तक वाहिनीवरच्या संवादाचा हा विडिओ स्वतः रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस विजया रहाटकर यांनी तो रिट्विट केला आहे. त्याला सोशल मीडिया यूजर्सचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.