वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भारतीय राजकारणात आता उघडपणे ऍक्टिव्ह नसलेल्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज बऱ्याच दिवसांनी लोकसभेत बोलल्या आणि फेसबुक – सोशल मीडियावर घसरल्या. देशातल्या लोकशाहीला फेसबुक आणि सोशल मीडियाने हॅक केले आहे. देशात सत्तेवर कोण आहे या पेक्षा सोशल मीडियाचा देशातल्या लोकशाही प्रक्रियेतला हस्तक्षेप थांबवा. निवडणूकांमधला प्रभाव संपवा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला केले.Social media being used to hack democracy, charges Sonia Gandhi in LS
सोनिया गांधींनी शून्य प्रहरात सोशल मीडिया प्रभावाचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, गेल्या काही दिवसांत हे निदर्शास आले आहे, की फेसबुक किंवा सोशल मीडिया साईट्स वरून समाजात तेढ निर्माण करणारा कन्टेट प्रसारित केला जातो आहे. लोकशाही प्रक्रियेवर निवडणूकांमध्ये फेसबुकसारखी माध्यमे अतिरिक्त आणि धोकादायक प्रभाव टाकत आहेत. लोकशाही वाचविण्यासाठी सोशल मीडियाचा घातक प्रभाव थोपविण्याची गरज आहे.
फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया साईट्सचा देशातल्या कॉर्पोरेट्सशी जवळचे हितसंबंध आहेत. त्यातून प्रापोगांडा चालवून निवडणूकीसाठी विशिष्ट नॅरेटिव्ह सेट केले जाते. निवडणूक त्या नॅरेटिव्ह भोवतीच फिरवल्या जातात. सर्व पक्षांना समान संधी नाकारल्या जातात. समाजात तेढ पसरविणाऱ्या गोष्टींची भरमार केली जाते. हा सगळा प्रकार लोकशाहीला घातक आहे. लोकशाही प्रक्रियाच यातून फेसबुकसारखी माध्यमे हॅक करतात, असे टीकास्त्र सोनिया गांधी यांनी सोडले.
सरकार कोणत्याही पक्षाचे असो. सोशल मीडियाचा घातक प्रभाव रोखलाच पाहिजे. १३० कोटींच्या देशात लोकशाही टिकलीच पाहिजे. यासाठी सरकारने फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईट्सना लगाम घालावा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले.
-सोनिया बऱ्याच दिवसांनी बोलल्या
सोनिया गांधी जरी काँग्रेसच्या राजकारणात ऍक्टिव्ह असल्या, तरी त्या संसदेत बऱ्याच दिवसांनी बोलल्या आहेत. विशेषतः ५ राज्यांच्या निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर त्या सोशल मीडियाच्या घातक प्रभावाबद्दल बोलल्या आहेत. अर्थातच भाजपवर त्यांचा निशाणा आहे. सोनियांच्या लोकसभतेल्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत.