आज तक या वृत्तवाहिनीचे पत्रकार रोहित सरदाना यांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, सरढाणे हे भाजपाचे हितचिंतक होते म्हणून तथाकथित लिबरल्स कडून त्यांची संपत्तीवरून बदनामी केली जात आहे. आता रोहित यांच्या पत्नीनेच समोर येऊन टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.So-called liberals defame Rohit Sardana over wealth, wife gives correct answer
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज तक या वृत्तवाहिनीचे पत्रकार रोहित सरदाना यांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, सरढाणे हे भाजपाचे हितचिंतक होते म्हणून तथाकथित लिबरल्स कडून त्यांची संपत्तीवरून बदनामी केली जात आहे.
आता रोहित यांच्या पत्नीनेच समोर येऊन टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.आज तकचे न्यूज अँकर असलेले रोहित सरदाना यांचे दिल्लीत कोरोनावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका आल्याने झाले होते.
टीव्ही जगतात रोहित सरदाना हे एक मोठं नाव होतं. त्यांनी आज तकसोबतच या अगोदर झी न्यूजसोबत प्राईम टाईम अँकर म्हणून काम केलं आहे. आज तक वर त्यांचा दंगल हा कार्यक्रम लोकप्रिय होता.
आपला हा कार्यक्रम वास्तवदर्शी करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. टीव्हीवरील अनेक न्यूज अॅँकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा अजेंडा चालवित असताना सरदाना यांनी पत्रकारितेचे मूल्य पाळत कोणाचीही निष्कारण बदनामी करण्याचे किंवा टीका करण्याचे टाळले होते.
त्यामुळे तथाकथित लिबरल्सना त्यांच्याबद्दल राग होता. गिधाडी प्रवृत्तीने सरदाना यांच्या मृत्यूनंतरही त्यांची बदनामी सुरू ठेवली. सरदाना यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याच्या कंड्या पिकविल्या जात आहेत.
गोदी मीडियातील असल्याने सरकारकडून त्यांनी अनेक फायदे उपटल्याचेही बेदिक्कतपणे सांगितले जात आहे. एका यूट्यूब चॅनलने तर एक शोच केला होता. त्यामध्ये अंजना ओम कश्यप आणि रोहित सरदाना यांच्यातील कोण श्रीमंत आहे, दाखविले होते.
आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून रोहित सरदाणा यांनी खूप पैसे कमावले. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू मोटार असून तिची किंमत ६४ लाख रुपये आहे. त्याचबरोबर इतरही मोटारी आहेत. आलिशान घर आहे.
त्यांची संपत्ती १४.५४ कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या घराचे काही फोटोही दाखविले होते. एका चॅनलने तर म्हटले की त्यांची संपत्ती ७० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
सरदाना यांच्या नाहक बदनामीने व्यथित होऊन त्यांच्या पत्नी प्रमिला दीक्षित यांनी म्हटले आहे की त्यांच्याकडे गाझियाबाद येथे १४५० चौरस फुटाचा फ्लॅट आहे. एक के्रटा गाडी आहे.
दोन्हींचाही इएमआय अजून चालू आहे. रोहित सरदाना यांनी वशिला लावून कोरोना प्रतिबंधक लसही घेतली नाही. आम्हाला कोणाचे उपकार नको पण मृत्यूनंतरही अशी बदनामी तरी करू नका.
So-called liberals defame Rohit Sardana over wealth, wife gives correct answer
महत्त्वाच्या बातम्या
- जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर अटी लादण्याचा प्रयत्न करू नका, केंद्र सरकारने ट्विटरला फटकारले
- कोरोना महामारीतील मंदीविरुध्द लढण्यासाठी नोटा छापा, बॅँकर उदय कोटक यांचे सरकार आणि रिझर्व्ह बॅँकेला सल्ला
- फेसबुकनेही मान्य केले कोरोना व्हायरस लॅबमध्येच बनविला, आता कोरोना मानवनिर्मित असल्याच्या पोस्ट डिलीट होणार नाहीत
- कोरोना विषाणूच्या मुळावरुन खवळलेल्या चीनने उगाळला अमेरिकेचा ‘काळा इतिहास’
- संकटमोचक बॉबी नसणे ममता बॅनर्जींसाठी सर्वाधिक डोकेदुखी