• Download App
    स्मृति इराणी यांच्या महिला व बालकल्याण विभागाचा सुपोषित इंडियाचा नारा, पोषण ट्रॅकरवर दहा कोटी लाभार्थ्यांच्या नोंदणीचा टप्पा पूर्ण,|Smriti Irani's Women and Child Welfare Department's slogan for a SuPoshit India, Registration of 10 crore beneficiaries on Poshan tracker completed,

    स्मृति इराणी यांच्या महिला व बालकल्याण विभागाचा सुपोषित इंडियाचा नारा, पोषण ट्रॅकरवर दहा कोटी लाभार्थ्यांच्या नोंदणीचा टप्पा पूर्ण,

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सुपोषित इंडियाचा नारा देत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी सुरू केलेल्या पोषण ट्रॅकरवर दहा कोटी लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील माता आणि बालकांची काळजी घेणे शक्य झाले आहे.Smriti Irani’s Women and Child Welfare Department’s slogan for a SuPoshit India, Registration of 10 crore beneficiaries on Poshan tracker completed,

    संपूर्ण देशात अंगणवाडी सेविकांचे जाळे आहे. त्यांच्या माध्यमातून महिला, गरोदर माता, बालके यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. मात्र, आजपर्यंत हे अनुदान खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हते.



    डिजीटल इंडियात खºया लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्मृति इराणी यांच्या कल्पनेतून मार्च २०२१ मध्या पोषण ट्रॅकर हे अ‍ॅप विकसित केले. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोनही देण्यात आले आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मुलांच्या जन्मापासूनच्या नोंदी ठेवते.

    त्याचबरोबर गरोदर आणि स्तनदा मातांचीही माहिती भरली जाते. त्यामुळे केंद्र सरकारकडे त्यांची सर्व माहिती जाते. या माध्यमातून देशातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी स्मृति इराणी यांचा प्रयत्न आहे.

    स्मृति इराणी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मार्च २०२१ मध्ये लॉँच केलेल्या पोषण ट्रॅकरवर १० कोटी लाभार्थ्यांची नोदंणी झाली आहे. आमच्या सुपोषित इंडिया प्रयत्नातील हा मोठा टप्पा आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅडमिन देशातील कुपोषणाची समस्या समजून घेऊ शकतो. लाभार्थ्यांना वेळेवर मदत पोहोचविणेही शक्य होत आहे.

    Smriti Irani’s Women and Child Welfare Department’s slogan for a SuPoshit India, Registration of 10 crore beneficiaries on Poshan tracker completed,

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही