• Download App
    गुजरातमधील पाच महिन्यांच्या चिमुकल्याला दिले जगातील सर्वात महागडे १६ कोटींचे इंजेक्शन|Small child get injection Of 16 crore in gujrat

    गुजरातमधील पाच महिन्यांच्या चिमुकल्याला दिले जगातील सर्वात महागडे १६ कोटींचे इंजेक्शन

    विशेष प्रतिनिधी

    लुनावडा : पाठीच्या कण्याचा दुर्मिळ जनुकीय आजार झालेल्या मुलाला तब्बल १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी समाजाला साद घातली.Small child get injection Of 16 crore in gujrat

    समाजानेही मदतीचा हात पुढे केला अन क्राऊडफंडिगच्या माध्यमातून १६ कोटी रुपये जमले. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात मुलाला हे महागडे इंजेक्शन देण्यात आले.



    गुजरातेतील महिसागर जिल्ह्यातील लुनावडा शहरातील कानेसर गावात राहणाऱ्या राजदीपसिंह राठोड आणि जिनलबा या दांपत्याच्या धैर्यराज या मुलाला या दुर्मीळ आजाराने ग्रासले. त्यासाठी तब्बल १६ कोटींचे झोलगेनस्मा हे इंजेक्शन देण्याची गरज होती.

    हा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. त्यामुळे, त्यांनी मार्चमध्ये निधी जमा करण्याची मोहीम सुरू केली. त्यानंतर अवघ्या ४२ दिवसांतच १६ कोटी उभा राहिले. राजदीपसिंह राठोड म्हणाले, की मुलाच्या जन्मानंतर महिन्याभराने तो हातपाय हालवू शकत नसल्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला.

    त्यांनी या दुर्मीळ आजाराचे निदान केले.स्वीडनमधील औषधनिर्माण कंपनी नोव्हार्टिसकडून हे इंजेक्शन तयार केले जाते. या चिमुकल्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी हा आजार झाला होता.

    यात पाठीच्या कण्यातील पेशींची झीज झाल्याने स्नायूंवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे स्नायू कमकुवत होऊन श्वसनाचा त्रास होतो. त्याचप्रमाणे, अवयवांच्या हालचालींवरही परिणाम होतो.

    Small child get injection Of 16 crore in gujrat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती

    लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला