• Download App
    पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या सभा भारतीयांच्या जीवापेक्षा मोठा आहेत का? येचुरी यांचा खडा सवाल |Sitaram yechuri targets PM Modi and Amit Shah

    पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या सभा भारतीयांच्या जीवापेक्षा मोठा आहेत का? येचुरी यांचा खडा सवाल

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार कायम ठेवल्याबद्दल भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने रविवारी टीकेची झोड उठविली.Sitaram yechuri targets PM Modi and Amit Shah

    अमित शहा आणि मोदी यांच्या सभा भारतीयांच्या जीवापेक्षा मोलाच्या आहेत का, असा सवाल सीपीआय-एमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला.येचुरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, वेगाने फैलावणाऱ्या जागतिक साथीमुळे देशवासीयांना यातना सोसाव्या लागत आहेत.



    अशावेळी आपल्याकडे केंद्र सरकार नव्हे तर पीआर कंपनी आहे, जिच्याकडे एक निवडणूक प्रचारक आहे, जो निष्ठुरपणे जनतेला वेदना, दैन्य आणि विनाशाच्या खाईत लोटतो आहे. पंतप्रधान पदाची नव्हे तर प्रचारकाची भूमिका मोदी यांनी महत्त्वाची वाटते.

    त्यामुळेच त्यांनी निवडणूक प्रचाराला प्राधान्य दिले आहे. त्यातून वेळ उरलाच तर ते घाईघाईने दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी छायाचित्रे आणि मथळे मिळतील असे काहीतरी करतात. ही स्थिती अत्यंत खेदजनक आहे.देश अनेक दशकांतील सर्वाधिक भीषण संकटाचा सामना करीत असून

    ही स्थिती युद्धासारखी असल्याचे एका माजी लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. मोदी मात्र प्रचारात व्यस्त आहेत. ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपलब्ध नाहीत. सामुहीक संसर्गास कारणीभूत ठरणारे उपक्रम (सुपरस्प्रेडर) पार पडल्यानंतर ते बैठकांचा देखावा करीत आहेत, असेही येचुरी यांनी म्हटले आहे.

    Sitaram yechuri targets PM Modi and Amit Shah

    Related posts

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला