वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सीबीआयने मंगळवारी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांविरोधात राऊज अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सिसोदियांना प्रथमच आरोपी बनवण्यात आले आहे. सिसोदियांशिवाय या आरोपपत्रात हैदराबादेतील सीए बुच्ची बाबू गोरंटला, अर्जुन पांडे आणि अमनदीप सिंह ढलचाही आरोपींत समावेश करण्यात आला आहे. या आरोपपत्रावर कोर्ट 12 मे रोजी सुनावणी करणार आहे.Sisodian’s name for the first time in CBI’s chargesheet in liquor scam, bail hearing today
बुच्ची बाबू गोरंटला तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेख राव यांच्या कन्या कवितांचे सीए आहेत. या प्रकरणात ईडीने कवितांचीही चौकशी केली आहे.
आरोपपत्रात एजन्सीने म्हटले आहे की, या प्रकरणात मोठा कट आणि इतर आरोपींच्या भूमिकेचा तपास केली जात आहे. सीबीआयने शेवटचे आरोपपत्र 25 नोव्हेंबर 2022 रोजी दाखल केले होते.
बुच्ची बाबू जामिनावर
या प्रकरणातील पहिल्या आरोपपत्रात सीबीआयने आरोप लावला होता की संशयित अभिषेक बोईनपल्लीने साऊथ ग्रुपच्या इशाऱ्यावर 20-30 कोटी रुपये गोळा केले. हा पैसा विजय नायरला दिनेश अरोराच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबर 2021 दरम्यान रोख स्वरुपात देण्यात आला. असेही आरोप केले की, सिसोदियांनी महेंद्रूंची कंपनी इंडो स्पिरिटच्या अर्जावर वैयक्तिकरित्या हस्तक्षेप केला.
आरोपपत्रात संशयित म्हणून माजी महसूल आयुक्त अरवा गोपी कृष्णांच्याही नावाचा समावेश आहे. चार आरोपींपैकी मनीष सिसोदिया आणि अमनदीप ढल हे दोन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात बुच्ची बाबूला 6 मार्च 2023 रोजी जामीन मिळाला आहे. अर्जुन पांडेला कधीही अटक झाली नाही.
बुधवारी मनीष सिसोदियांच्या जामिनावर निर्णय
मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी दिल्लीतील कोर्ट 26 एप्रिल रोजी सिसोदियांच्या जामिनावर निर्णय देणार आहे. 31 मार्च रोजी विशेष न्यायालयाने सिसोदियांचा जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
Sisodian’s name for the first time in CBI’s chargesheet in liquor scam, bail hearing today
महत्वाच्या बातम्या
- लव्ह जिहादचा प्रचार करणाऱ्या व्हायरल जाहिरातीवर VIP बॅग्जचा खुलासा जाहीर, त्याच्याशी कोणताही संबंध नाकारला
- रिफायनरी साठी नाणार ऐवजी बारसूची जागा निवडली ठाकरे – पवार सरकारनेच; उद्धव ठाकरेंनी मोदींना लिहिलेले पत्र व्हायरल!!
- ठाकरे – पवारांनी टेनिस मॅच खेळण्याएवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे सोपे उरलेय का??; खरे “पंच” तर बसलेत दिल्लीत!!
- दादरा आणि नगर हवेलीला पंतप्रधान मोदींनी दिली पाच हजार कोटींच्या योजनांची भेट