Singapore Variant Of covid 19 : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असली तरी तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यांसह केंद्र सरकार दक्षता घेत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या ‘सिंगापूर व्हेरिएंट’वर इशारा देणारे ट्वीट करत तिथली विमानसेवा बंद करण्याचे आवाहन केले होते. यावरून आता वाद सुरू झाला आहे. सिंगापूर सरकारने तर भारतीय उच्चायुक्तांना बोलावून आक्षेप नोंदवला आहे. singapore diplomat and health ministry Takes Strong Objection On cm arvind kejriwal tweet about New Singapore Variant Of covid 19
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असली तरी तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यांसह केंद्र सरकार दक्षता घेत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या ‘सिंगापूर व्हेरिएंट’वर इशारा देणारे ट्वीट करत तिथली विमानसेवा बंद करण्याचे आवाहन केले होते. यावरून आता वाद सुरू झाला आहे. सिंगापूर सरकारने तर भारतीय उच्चायुक्तांना बोलावून आक्षेप नोंदवला आहे.
सर्वात आधी केंद्र सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. भारत आणि सिंगापूरदरम्यान पूर्वीपासूनच फ्लाइट बंद आहेत. आता सिंगापूर सरकारनेही यावरून तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सिंगापूर सरकारने भारतीय उच्चायुक्तांना बोलावून आक्षेप नोंदविला.
भारतातील सिंगापूरच्या राजदूतांकडून बुधवारी अरविंद केजरीवाल यांना ट्वीटवर उत्तर देण्यात आले, यात म्हटले होते की, सिंगापूरमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. टेस्टिंगच्या आधारे कळले आहे की, सिंगापूरमध्ये कोरोनाचा B.1.617.2 व्हेरिएंटच आढळला आहे, याची काही लहान मुलांमध्ये लागण झाली आहे.
केजरीवाल यांच्या वक्तव्यामुळे सिंगापूर नाराज, MEA ने दिले उत्तर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या वक्तव्यावरून हा वाद वाढला आहे. सिंगापूर सरकारने तेथे भारतीय उच्चायुक्तांना बोलावून सिंगापूर स्ट्रेनवरील ट्विटवर आक्षेप घेतला आहे. कोविडचे प्रकार किंवा हवाई वाहतूक धोरणावर बोलण्याचा अधिकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना नाही, असे उत्तर भारताकडून देण्यात आले आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही या वादावरून ट्वीट करून म्हटले आहे की, सिंगापूर आणि भारत दोन्ही देश कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहेत. या लढ्यात सिंगापूरने भारताला दिलेल्या मदतीबद्दल धन्यवाद. मला हे स्पष्ट करायचे आहे की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे विधान भारताचे नाही.
केवळ सिंगापूर दूतावासच नाही, तर सिंगापूर सरकारच्या आरोग्य मंत्रालयानेही मंगळवारी एका प्रसिद्धिपत्रकात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा नाकारला आहे.
सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विव्हियन बालकृष्णन यांनीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना यावर उत्तर दिले. ते म्हणाले की, राजकारण्यांनी वस्तुस्थितीवर बोलले पाहिजे, सिंगापूरमध्ये कोरोना कोणताही व्हेरिएंट नाही.
दिल्ली सरकारने दिले स्पष्टीकरण
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली सरकारकडून स्पष्टीकरण आले आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले की, यावेळी कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन असून जिनोम सिक्वेंन्सद्वारे शोधले जात आहेत. विमान लंडनहून येत असताना आम्ही त्यांना रोखण्याचे आवाहन केले. संध्याकाळी संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले जाईल, असे सत्येंद्र जैन म्हणाले.
काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ट्वीट केले होते की, सिंगापूरला आलेल्या कोरोनाचे नवीन रूप मुलांसाठी अतिशय धोकादायक असल्याचे वर्णन केले जात आहे. ही भारतातील तिसरी लाट म्हणून येऊ शकते. केंद्र सरकारला माझे आवाहन आहे की, सिंगापूरसह हवाई सेवा तातडीने प्रभावीपणे रद्द कराव्यात, मुलांसाठी लसीच्या पर्यायांवरही प्राधान्याने काम केले पाहिजे.
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटवर यापूर्वीच प्रत्युत्तर दिले आहे. हरदीप पुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, केजरीवालजी मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. सिंगापूरशी एअर बबलदेखील नाही आहे. फक्त काही वंदे भारत उड्डाणांतून आपण तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणतो. ती आपलीच माणसे आहेत. तरीही परिस्थितीवर आमची नजर आहे. सर्व सावधगिरी बाळगली जात आहे.
विशेष म्हणजे, आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, कोरोनाची तिसरी लाटही येऊ शकते. यात मुलांना सर्वाधिक धोका होऊ शकतो. यामुळे आतापासूनच सर्व तयारी केली जात आहे, काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने मुलांवरील लसीच्या ट्रायलला मंजुरी दिली होती.
singapore diplomat and health ministry Takes Strong Objection On cm arvind kejriwal tweet about New Singapore Variant Of covid 19
महत्त्वाच्या बातम्या
- Covid 19 Vaccine : कोरोना लस तयार करण्याचा परवाना एकाऐवजी 10 कंपन्यांना द्या, नितीन गडकरींची मौलिक सूचना
- Coronavirus Cases in India : भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून कमी रुग्ण, पहिल्यांदाच एका दिवसात 4529 मृत्यू
- आणखी एक लस : Sanofi GSK च्या कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलला लवकरच सुरुवात
- यूपी सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन, PM मोदी आणि CM योगी आदित्यनाथंनी व्यक्त केला शोक
- Cyclone Tauktae : पीएम मोदी गुजरात-दीवच्या दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा