विशेष प्रतिनिधी
मनाली : मनाली, सिमला येथे सध्या पर्यटकांची तुडूंब गर्दी पाहावयास मिळत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या पर्वतीय राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे.Simla, Manali blossomed with the storm of tourists, there is no trace of Corona
उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट असताना त्यापासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक सिमला, कुफ्री, नारकंडा, डलहौसी, धर्मशाला, मनाली, लाहोल, डेहराडूनला जात आहेत.
मनालीतील नागरिकांच्या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मनाली आणि सिमला येथे गेल्या आठवड्यात सर्व हॉटेल फुल्ल झाले होते. हॉटेलमध्ये जागा नसल्याने पंजाब, उत्तर प्रदेश, हरियानातून आलेल्या पर्यटकांना रस्त्यावरच राहावे लागले आहे.
जूनमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर आतापर्यंत दीड महिन्यात सहा ते सात लाख पर्यटकांनी मनाली, सिमल्याला भेट दिली आहे. उत्तर भारतात सध्या उष्णता असल्याने पर्यटक हिमालयीन राज्यात येत आहेत.
पोलिसांकडून पर्यटकांना नियम पाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत. १० हजारापेक्षा अधिक वाहने सिमल्यात गेल्या आठवड्यात दाखल झाली. हॉटेलमध्ये जागा नसून सिमला आणि किन्नोरच्या दुर्गम भागातही पर्यटक गर्दी करत आहेत.
कोरोनाच्या काळात हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करताना कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल आणि ई-पास असणे बंधनकारक होते. परंतु आता हा निर्णय मागे घेतल्याने गर्दी वाढली आहे. राज्याची अर्थव्यवस्था आणि रोजगार पर्यटनावरच अवलंबून असल्याने सरकारने शिथिलता दिली आहे.
Simla, Manali blossomed with the storm of tourists, there is no trace of Corona
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानसाठी तस्करी करणाऱ्या दोन लष्करी जवानांना अटक, मादक पदार्थांच्या तस्करीची चौकशी करताना दोघे जाळ्यात
- लेबनान प्रचंड आर्थिक संकटात, जनतेचा उद्रेक होण्याची भीती
- गाझियाबादच्या दयावतींची दानशूरता, बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठास दान दिली १० कोटी रुपयांची जमीन दान
- Monsoon Session 2021 : पावसाळी अधिवेशनात काय कामकाज झाले? कोणती विधेयके – कोणते ठराव पास झाले? वाचा सविस्तर..