• Download App
    पूर्वेकडे काँग्रेसमध्ये फूट पाडून ममतांचे विरोधी ऐक्य; माजी प्रदेशाध्यक्षांच्या पत्नी शिखा मित्रा आणि आसामचे ५०० कार्यकर्ते तृणमूळ काँग्रेसमध्ये Sikha Mitra, former MLA and wife of late former WB Congress President Somen Mitra, joined TMC earlier today.

    पूर्वेकडे काँग्रेसमध्ये फूट पाडून ममतांचे विरोधी ऐक्य; माजी प्रदेशाध्यक्षांच्या पत्नी शिखा मित्रा आणि आसामचे ५०० कार्यकर्ते तृणमूळ काँग्रेसमध्ये

    वृत्तसंस्था

    कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विरोधी ऐक्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. त्यांच्या मुखात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक भाषा आहे. पण त्या फूट मात्र काँग्रेसमध्ये पाडून आपली तृणमूळ काँग्रेस बळकट करीत निघाल्या आहेत. Sikha Mitra, former MLA and wife of late former WB Congress President Somen Mitra, joined TMC earlier today.

    पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसेचे माजी प्रदेशाध्यक्ष दिवंगत सोमेन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्रा यांना ममतांनी काँग्रेसमधून फोडून तृणमूळ काँग्रेसमध्ये सामावून घेतले आहे.

    तसेच आसाममध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, माजी खासदार सुष्मिता देव यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० काँग्रेस कार्यकर्त्यांनी आजच तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आसाममध्ये काँग्रेसने बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड फ्रंट या जातीयवादी पक्षाशी आघाडी केल्याचा ठपका सुष्मिता देव यांनी ठेवला आहे. परंतु, प्रत्यक्षात विधानसभा निवडणूकीत आघाडी करताना त्या काँग्रेसच्याच नेत्या होत्या आणि त्यांनी आघाडीचा प्रचारही केला आहे.

    शिखा मित्रा यांना काँग्रेसने आमदार केले होते. त्यांचे पती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शिखा मित्रा यांना आपले पती पूर्वी तृणमूळ काँग्रेसचे खासदार असल्याची आठवण झाली आहे. बंगालच्या जनतेची तृणमूळ काँग्रेसमध्ये जाऊनच सेवा करता येईल, याची खात्री पटल्याचे शिखा मित्रा यांनी त्या पक्षात प्रवेश करताना सांगितले.

    Sikha Mitra, former MLA and wife of late former WB Congress President Somen Mitra, joined TMC earlier today.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!