Thursday, 1 May 2025
  • Download App
    चंद्रयान -२ उपकरणांनी नोंदविली महत्वपूर्ण निरीक्षणे, त्यावरून चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोक्सिल व पाण्याचा बर्फ,क्रोमियम व मँगनीजही सापडले|Significant observations reported by Chandrayaan-2 instruments, which also found hydroxyl and water ice, chromium and manganese on the lunar surface

    चंद्रयान -२ उपकरणांनी नोंदविली महत्वपूर्ण निरीक्षणे, त्यावरून चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोक्सिल व पाण्याचा बर्फ,क्रोमियम व मँगनीजही सापडले

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : चंद्रयान-२ अंतराळ यानाला चंद्रकक्षेत दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या यानावरी उपकरणांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवित नवीन शोधही लावले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोक्सिल व पाण्याचा बर्फ असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचबरोबर काही प्रमाणात क्रोमियम व मँगनीजही सापडले असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) म्हटले आहे.Significant observations reported by Chandrayaan-2 instruments, which also found hydroxyl and water ice, chromium and manganese on the lunar surface

    या आठवड्याच्या प्रारंभी इस्रोने दोनदिवसीय चंद्रविज्ञान कार्यशाळा व चंद्रयान-२ आकड्यांचे विमोचनच्या रूपात चंद्रविज्ञानावरील वैज्ञानिक चर्चा केली. यामध्ये शिक्षण तज्ज्ञ, संस्था आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येत आहे. चंद्रयान-२ अंतराळयानाला चांद्रकक्षेत दोन वर्षे पूर्ण होण्याचा उत्सव या कार्यशाळेत साजरा करण्यात आला.



    आॅनलाईनच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात अंतराळ विभागातील (डीओएस) इस्रो अध्यक्ष व सचिव के. सिवन यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. याचवेळी चंद्रयान-२ विज्ञान परिणाम व आकड्यांवरील माहिती त्यांनी सादर केली. चंद्रयान-२ वर आठ वैज्ञानिक उपकरणे नेण्यात आली आहेत. त्यांनी अत्यंत महत्वाचे शोध लावले आहेत.

    चंद्रयान-२ने आयआयआरएसच्या मदतीने प्रथमच चंद्राच्या जलयोजन वैशिष्ट्यांचा माग घेतला. त्यावरून चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोक्सिल व पाण्याच्या बफार्चे स्पष्ट संकेत दिले आहेत. क्लास उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर क्रोमियम व मँगनीज असल्याचे शोधले आहे. त्याचे प्रमाण कमी असले तरी चंद्रावर ही खनिजे असणे महत्वाचे आहे.

    त्याचबरोबर स्पेक्ट्रोमीटर चेस-२ या उपकरणाने एका ध्रुवीय कक्षीय मंचावरून चंद्राबाहेरील वातावरणाच्या आवेशहीन संरचनेचा पहिल्यांदा तेथे राहून अभ्यास केला. मध्य व उच्च अक्षांशांवर आर्गन-४०च्या परिवर्तनशीलतेचा शोध या उपकरणांनी लावला आहे. एक्सएसएम उपकरणाने सूर्य शांत राहण्याच्या कालावधीत त्याच्या मायक्रोफ्लेअरचे निरीक्षण केले. त्यामुळे सूर्याच्या बाहेरील वायुमंडलाच्या ताप समस्येवर महत्त्वाची माहिती देते.

    Significant observations reported by Chandrayaan-2 instruments, which also found hydroxyl and water ice, chromium and manganese on the lunar surface

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Caste census : काँग्रेसने राहुलच्या यशाचे ढोल पिटले तरी प्रत्यक्षात मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी, “मंडल” राजकारणात एन्ट्री!!

    Navjot Sidhu : नवज्योत सिद्धू म्हणाले- पंजाबमध्ये राजकारण हा एक व्यवसाय बनला; मी माझे इमान विकले नाही

    PM missing’ poster : ‘PM गायब’ पोस्टर वादावर काँग्रेसची आपल्या नेत्यांना सूचना; फक्त अधिकृत नेत्यांनीच विधाने करावी; बेशिस्तीवर कारवाई