शपथविधीचा मुहूर्तही ठरला; जाणून घ्या कधी होणार कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवले खरे मात्र त्यानंतर कर्नाटकचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार, हे ठरवताना काँग्रेसचे जे राजकीय नाट्य चाललं, ते पाहून सामान्य जनताही थक्क होती. कारण, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावं होतं, त्यात प्रामुख्याने सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार ही दोन नावं आघाडीवर होती. या दोघांपैकी कोणाला मुख्यमंत्रीपदावर बसवावं हेच काँग्रेसला ठरवता येत नव्हतं. अखेर कर्नाटकचे हे नाटक संपले असून, पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्या गळ्यात काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची माळ घातल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. Siddaramaiah to be next Karnataka CM, DK Shivakumar to be his deputy
याचबरोबर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे आणि कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार, काँग्रेसचे संकटमोचक म्हटले जाणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना मात्र काँग्रेसने मुख्यमंत्रीपद डावलून, त्यांची उपमुख्यमंत्रीपदावर बोळवण केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी एकमत केले. शनिवारी (20 मे) बेंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे. सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज सायंकाळी ७ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.
तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी (17 मे) दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.
Siddaramaiah to be next Karnataka CM, DK Shivakumar to be his deputy
महत्वाच्या बातम्या
- West Bengal : पूर्व मिदनापूरच्या इगरामध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सहा जणांचा मृत्यू
- सिद्धरामय्या की शिवकुमार??; गांधी परिवारात आई विरुद्ध मुलगा; मल्लिकार्जुन खर्गे पेचात!!
- अमेरिकन शिष्टमंडळाने राजदूत एरिक गारसेट्टींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट
- आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25000 रुपये; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय