• Download App
    सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री; डी. के. शिवकुमार, जी. परमेश्वरन काय करणार?? Siddaramaiah Chief Minister of Karnataka

    सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री; डी. के. शिवकुमार, जी. परमेश्वरन काय करणार??

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेस मधला मुख्यमंत्री पदाचा पेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मिटवल्याचे मानले जात आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे काँग्रेस श्रेष्ठींनी सोपवली आहेत. पण त्यातूनच प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि 50 आमदारांचा पाठिंबा जाहीर करणारे जी. परमेश्वरन हे नेमके काय करणार??, असा सवाल तयार झाला आहे. Siddaramaiah Chief Minister of Karnataka

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर चार दिवसांनी मोठ्या मंथनानंतर सिद्धरामय्या यांच्या पारड्यात काँग्रेस श्रेष्ठींचा कौल गेला. यामागे सिद्धरामय्या यांची “पॉलिटिकल न्यूसन्स व्हॅल्यू” कामाला आल्याचे बोलले जात आहे. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले नसते, तर ते स्वतःच “सचिन पायलट” बनवण्याच्या तयारीत असल्याची भीती काँग्रेस श्रेष्ठींना वाटल्याने त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली गेली.

    पण त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन असंतुष्ट तयार झाले असून डी. के. शिवकुमार यांनी आपण साधे आमदारच राहू असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे शिवकुमार यांची साथ सिद्धरामय्या यांना कितपत मिळेल याविषयी शंका तयार झाली आहे. त्याचबरोबर जी. परमेश्वरन हे माजी उपमुख्यमंत्री 50 आमदारांच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत होते. ते आता कोणती भूमिका घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    सिद्धरामय्या यांच्या पारड्यात काँग्रेस श्रेष्ठींनी आपले वजन टाकले असले तरी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 135 आमदार त्यांच्याच पाठीशी असतील याची खात्री कोण देणार??, हा सवाल तयार झाला आहे.

    Siddaramaiah Chief Minister of Karnataka

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते