• Download App
    अवैध खाणकाम प्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जाण्याऐवजी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे शक्तिप्रदर्शन; वर भाजपला धमकीहीShow of power by Jharkhand CM instead of facing ED probe in illegal mining case

    अवैध खाणकाम प्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जाण्याऐवजी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे शक्तिप्रदर्शन; वर भाजपला धमकीही

    वृत्तसंस्था

    रांची : झारखंड मधल्या अवैध खाणकाम प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी चौकशीला सामोरे जाण्याऐवजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजधानी रांचीतल्या आपल्याच निवासास्थानासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे, इतकेच नव्हे तर केंद्रातील सत्ताधारी भाजपला धमकी देखील दिली आहे. Show of power by Jharkhand CM instead of facing ED probe in illegal mining case

    झारखंड मधल्या आदिवासी क्षेत्रात अवैध खाणकाम सुरू आहे. त्यांची कंत्राटे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशिष्ट व्यक्ती आणि संस्थांना दिली आहेत. यात हेमंत सोरेन यांच्या भावाचाही समावेश आहे. सुमारे 900 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात सध्या झारखंडच्या एक महिला अधिकारी श्रीमती सिंघल ईडीच्या कोठडीत आहेत. ईडीची या प्रकरणातील चौकशी आणि तपास पुढे जाऊन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने समन्स पाठविले आहे. आज त्यांनी चौकशी आणि तपासासाठी ईडी कार्यालयात हजर राहणे अपेक्षित होते. परंतु त्या ऐवजी त्यांनी रांचीतील आपल्या घरासमोर शक्तिप्रदर्शन करणे पसंत केले.

    हे शक्तिप्रदर्शन करताना हेमंत सोरे यांनी भाजपला धमकी देखील दिली आहे. जर आम्ही गुन्हा केला आहे, तर ईडीने सरळ आम्हाला अटक करावी. झारखंडमध्ये भाजप कार्यालयांची सुरक्षा वाढवली आहे. कारण झारखंडी लोकांची त्यांना भीती वाटते. अजून तर आम्ही झारखंडींनी काही केले देखील नाही. पण एकदा झारखंडी चिडले आणि ते आपल्या औकातीवर उतरले, तर तो दिवस फार दूर नाही जेव्हा या भाजपवाल्यांना तोंड लपवायला सुद्धा जागा उरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजप नेत्यांना धमकी दिली आहे.

    भाजपवाल्यांनी नेहमी आदिवासी, दलित, पिछडे यांना संपवण्याचे काम केले. दलित आदिवासी पिछडे यांनी पुढे येऊ नये, असे त्यांना वाटते. हा समाज पुढे आला की भाजपवाले चिडतात. त्यामुळेच त्यांनी झारखंडचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण आत्तापर्यंत त्यांना या कामात अपयशच आले आहे, असा टोला हेमंत सोरेन यांनी लगावला आहे.

    Show of power by Jharkhand CM instead of facing ED probe in illegal mining case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य