विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर ब्रिटनमध्ये हाहाकार माजला असून गेल्या २४ तासांत तब्बल १ लाख ६ हजार १२२ नवे करोना बाधित आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ब्रिटनमध्ये कोविडची साथ आल्यापासूनची ही सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली असून दैनंदिन रुग्णसंख्येने प्रथमच लाखाचा आकडा पार केला आहे.Shockingly, more than a lakh corona infections were found in a single day in Britain
ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णसंख्येने लाखाचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी हाती आली असून त्यात करोनाचे १ लाख ६ हजार १२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
त्यात एकाच दिवशी ओमिक्रॉनचे १२ हजार १३३ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण होऊन ब्रिटनमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या ३७ हजार १०१ इतकी झाली आहे.
ब्रिटनमध्ये शुक्रवारी ९३ हजार ४५ तर शनिवारी ९० हजार ४१८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्येने थेट लाखाचा टप्पा ओलांडल्याने सरकारी पातळीवर वेगवान पावले टाकण्यात येत आहेत. नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे. ब्रिटनच्या कॅबिनेटमध्ये कोविड स्थितीवर चर्चा करण्यात आली.
कडक लॉकडाऊन लावले जावे का, यावरही विचार करण्यात आला. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटनसह संपूर्ण यूरोपसाठी अलर्ट जारी केला असून करोनाचा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. बूस्टर डोससाठी व्यापक व्यवस्था उभारावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
एकीकडे ब्रिटनसह यूरोपमधील अनेक देशांत करोनाने थैमान घातले असताना भारत सतर्क झाला आहे. भारतात ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. देशातील रुग्णसंख्या २२९ वर पोहचली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुन्हा कठोर निर्बंध लावेल जातील असे संकेत मिळत आहेत.
याबाबत केंद्र सरकारने सर्वच राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यात दिल्लीत नाताळ सेलिब्रेशन आणि न्यू ईयर सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतही हे सेलिब्रेशन टाळण्याची सूचना देण्यात आली आहे.
Shockingly, more than a lakh corona infections were found in a single day in Britain
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुन्हा वाराणसीत; ८७० कोटींच्या २२ प्रकल्पांचा शिलान्यास आणि उद्घाटन!!
- घटस्फोटीत, सेकंड हॅन्ड म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री समांथाचे सडेतोड उत्तर
- आजारपणामुळे मुख्यमंत्री विधिमंडळात अनुपस्थित; पण अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष निवडीवर सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा!!
- मेहबूबा मुक्ती यांच्याकडून मोहम्मद अली जीनांची आरती; म्हणाल्या, ते तर गांधी-नेहरूंबरोबरचे स्वातंत्र्यसेनानी!!