विशेष प्रतिनिधी
बिस्वनाथ : आसाम राज्यातील बिस्वनाथ जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक मुस्लीम मुलीने बुरखा न घालता जीन्स टी शर्ट घालून दुकानात गेली असताना वयोवृद्ध दुकानदाराने तिच्यासोबत गैरवर्तणूक करून, तिला लज्जास्पद वागणूक देऊन हाकलून लावले. जर तिने बुरखा न घालता जीन्स वगैरे घातली तर माझ्या घरातील स्त्रियांवर वाईट परिणाम होतील, असे त्याचे म्हणणे होते.
Shocking! Mistreatment of girl as wearing jeans instead of Burakha
पीडित मुलगी आसाम राज्यातील बिस्वनाथ जिल्ह्यातील राहणारी आहे. मोबाइल फोन अॅसेसरीज दुकानामध्ये ती इयरफोन खरेदी करण्यासाठी गेली असताना, दुकानाचा मालक नूरुल अमीन यांने तिला इअर फोन देण्यास नकार दिला. आणि बुरखा ऐवजी जीन्स घातली म्हणून तिला भले वाईट बोलू लज्जास्पद वागणूकही दिली.
पीडित मुलीने इंडिया टुडेसोबत बोलताना ही माहिती दिली आहे. ती म्हणते, जेव्हा मी दुकानात पोहोचले तेव्हा दुकानमालकाने माझ्याशी गैरवर्तन केले. आणि पुन्हा दुकानात न येण्याचे सांगितले. दुकानदार वयोवृध्द असून आपले दुकान घरातून चालवतो. पण आश्चर्य म्हणजे या दुकानदाराच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीने त्याच्या वागण्यावर आक्षेप घेतला नाही. असे देखील तिने सांगितले आहे.
Shocking! Mistreatment of girl as wearing jeans instead of Burakha
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान