• Download App
    मध्य प्रदेशात काँग्रेसचे मुख्यमंत्री अर्जुन सिंहांच्या पुतळ्याचे शिवराज सिंह चौहान यांनी केले अनावरणShivraj Singh Chouhan unveiled the statue of Congress Chief Minister Arjun Singh in Madhya Pradesh

    मध्य प्रदेशात काँग्रेसचे मुख्यमंत्री अर्जुन सिंहांच्या पुतळ्याचे शिवराज सिंह चौहान यांनी केले अनावरण

    वृत्तसंस्था

    भोपाळ : काँग्रेसच्या नेत्यांचा भाजप नेते अपमान करत असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अनेकदा करतात. पण काँग्रेसचे नेते नेहरू – गांधी परिवार सोडून कोणाचा मान ठेवत नाहीत. याचा प्रत्यय मध्य प्रदेशात आज आला. Shivraj Singh Chouhan unveiled the statue of Congress Chief Minister Arjun Singh in Madhya Pradesh

    मध्य प्रदेशात काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे माजी राज्यपाल अर्जुन सिंह यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मध्य प्रदेशचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये केले. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

    अर्जुन सिंह हे इंदिरा आणि राजीव गांधींच्या काळात निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात. इंदिरा गांधींच्या काळात अर्जुन सिंह मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. चंबळ मधील अनेक डाकूंना त्यांनी राजकीय आश्रय देऊन शरणागती पत्रकाराला लावली होती. पंजाब अशांत झाला, खलिस्तानच्या मागणीने डोके वर काढले, त्यावेळी राजीव गांधींनी अर्जुन सिंह यांना मध्य प्रदेशातून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करत पंजाबच्या राज्यपाल पदी नेमले होते.

    राजीव गांधींच्या हत्येनंतर अर्जुन सिंह यांच्या मनात पंतप्रधान पदाची महत्त्वकांक्षा फुलली होती. त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांना आव्हान देखील दिले होते. पण शरद पवारांसारखेच अर्जुन सिंहांचे आव्हान देखील नरसिंह राव यांनी त्यावेळी मोडून काढले होते. पण नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्जुन सिंह कायम राहिले होते. याच अर्जुन सिंहांच्या पुतळ्याचे अनावरण शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळ मध्ये केले आहे.

    Shivraj Singh Chouhan unveiled the statue of Congress Chief Minister Arjun Singh in Madhya Pradesh

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता