• Download App
    अखिलेश यांना हटविण्यासाठी शिवपाल-आझम खान एकत्र, समाजवादी पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर|Shivpal-Azam Khan together to remove Akhilesh, Samajwadi Party on the verge of split

    अखिलेश यांना हटविण्यासाठी शिवपाल-आझम खान एकत्र, समाजवादी पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : समाजवादी पाटीर्चे प्रमुख अखिलेश यादव यांना हटविण्यासाठी उत्तर प्रदेशात नवीन समीकरणे उदयास येत आहेत. अखिलेश यांचे काका आणि प्रगतीशील समाजवादी पाटीर्चे अध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांनी सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची तुरुंगात जाऊन भेट घेतली. अखिलेश यांना हटविण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत.Shivpal-Azam Khan together to remove Akhilesh, Samajwadi Party on the verge of split

    पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांनी सांगितल्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवपाल यादव हे अखिलेश यादव यांच्यासोबत आले होते. तथापि, अखिलेश यादव यांच्या वागणुकीने शिवपाल सिंह नाराज आहेत. त्यांनी अखिलेश यांच्यावर नाराज असलेल्या नेत्यांना सोबत आणण्याची मोहीम सुरू केली आहे. शिवपाल सिंह यांनी शुक्रवारी सीतापूर तुरुंगात जाऊन वरिष्ठ नेते आझम खान यांची भेट घेतली. आजम खानही अखिलेश यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. शिवपाल आणि आजम खान यांची भेट म्हणजे समाजवादी पार्टीत फूट पडण्याची सुरुवात मानली जाते.



    शिवपाल आणि अखिलेश यादव यांच्यातील राजकीय संघर्षामुळे अनेक नेते पक्ष सोडण्याचा विचार करीत आहेत. अखिलेश यांना माझी अडचण वाटत असेल, तर आम्हाला पक्षातून काढून टाका, असे आव्हान शिवपाल सिंह यांनी गुरुवारी दिले होते. यावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया देण्याआधीच शिवपाल सिंह यादव शुक्रवारी आझम खान यांची भेट घेण्यासाठी सीतापूर तुरुंगात गेले.

    आजम खान यांची भेट घेतल्यानंतर शिवपाल सिंह यादव म्हणाले की, आझम खान हे पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. तरीही पक्ष त्यांना मदत करताना दिसत नाही. नेताजींनी खान यांचा मुद्दा पंतप्रधानांकडे मांडायला हवा होता? मी आणि आझम भाई सोबतच आहोत.

    Shivpal-Azam Khan together to remove Akhilesh, Samajwadi Party on the verge of split

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य