• Download App
    शिवसेनेचे हिंदुत्व ओरिजिनल सावरकर आणि बाळासाहेबांचे; "त्यांचे" बोगस; राज ठाकरेंना टोला!!Shiv Sena's Hindutva belongs to the original Savarkar and Balasaheb

    Sanjay Raut : शिवसेनेचे हिंदुत्व ओरिजिनल सावरकर आणि बाळासाहेबांचे; “त्यांचे” बोगस; राज ठाकरेंना टोला!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा वादात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर शिवसेना बॅकफूटवर गेली. मात्र, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व ओरिजनल आहे. ते शिवसेनेला सावरकर आणि बाळासाहेबांनी शिकवले आहे. मात्र राज ठाकरे यांचे हिंदुत्व बोगस आहे. त्यांच्या मास्तरांची डिग्रीच बोगस आहे, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपला लगावला आहे. Shiv Sena’s Hindutva belongs to the original Savarkar and Balasaheb

    मुळात त्यांचे आंदोलन कुठेच दिसत नाही आंदोलन कसे करायचे हे शिवसेनेकडून शिकावे. पण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखायला महाराष्ट्राचे ठाकरे सरकार सक्षम आहे. मला कुठेही आंदोलन झाल्याचे दिसत नाही. बेकायदा भोंगे उतरवले पाहिजेत. ते उतरले आहेत. सगळ्या मशिदींना सुप्रीम कोर्टाचे आदेश मान्य केले आहेत. अनेक मशिदींवरचे भोंगे मुस्लिमांनी स्वतः उतरवले आहेत. त्यामुळे हा वाद घालण्यात काहीच मतलब नाही. पण जे भाजपचे उपवस्त्र बनले आहेत, ते शिवसेनेला हिंदुत्व शिकवत आहेत म्हणून हे बोलावे लागते, असे राऊत म्हणाले.

    बाळासाहेबांच्या भाषणाचा राज ठाकरे नीट अभ्यास करावा. वाटल्यास आणखी कॅसेट आम्ही त्यांना पाठवून देऊ. बाळासाहेबांनी नमाजला पर्याय देऊन रस्त्यावरचे नमाज बंद करायला सांगितले आहे. त्यामुळे एक तर अशी भाषणे लावण्यात काहीच मतलब नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या दाव्यावर मनसे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    Shiv Sena’s Hindutva belongs to the original Savarkar and Balasaheb

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले