वृत्तसंस्था
पतियाला : पंजाबच्या पटियाला शहरात शुक्रवारी शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये संघर्ष पेटला. शिवसेनेने खलिस्तान्यांच्या विरोधात मोर्चा काढला असता पटियाला शहरातील काली माता मंदिरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. हिंदू आणि शीख संघटनांमध्ये दगडफेकीच्या घटनाही घडल्या. घटनास्थळी नियंत्रण मिळवण्यासाठी एसएसपी पोहोचले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. या दरम्यान हिंदू नेता आणि त्रिपदीचे एसएचओ कर्मवीर सिंग जखमी झाले.
शिवसेना कधीही खलिस्तान होऊ देणार नाही
यासंदर्भात शिवसेनेचे हरिश सिंगला म्हणाले की, शिवसेना कधीही पंजाबमध्ये खलिस्तान होऊ देणार नाही आणि कोणाला खलिस्तानीचं नावही घेऊ देणार नाही. सिख फॉर जस्टिसचे निमंत्रक गुरपतवंत पन्नू यांनी 29 एप्रिल रोजी खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही 29 एप्रिललाच खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते.
शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये दगडफेक
या मोर्चाबद्दल माहिती मिळताच खलिस्तानी समर्थक मोठ्या प्रमाणावर तिथे गोळा झाले होते. या मोर्चात शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. पटियाला शहरातील काली माता मंदिर परिसरात शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये दगडफेक झाली. या सगळ्या गोंधळामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. खलिस्तानी समर्थकांनी तलवारीने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत 15 राऊंड फायर करावे लागले.
Shiv Sainiks attacked Khalistani supporters in Captain Amarinder Singh’s Patiala
महत्त्वाच्या बातम्या
- कोकण चित्रपट महोत्सव – २०२२ रूपरेषा व पुरस्कार जाहीर
- Raj Thackeray : सभेपेक्षा जास्त चर्चा अटीशर्तींची; 15000 च्या गर्दीची…!!; पण यातले रहस्य काय…??
- हिंदीविरुध्द वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची उडी, बॉलीवुडवर साधला निशाणा
- समाज ठरवेल तोपर्यंतच सरकार राहू शकते, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- मुंबई पोलीसांनी आपल्या नावावर बनावट एफआयआर केला दाखल, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा