वृत्तसंस्था
कोलकाता : बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी हल्ला करून २ कृष्ण भक्तांची हत्या केली. यावर काही कारवाई करण्याऐवजी ट्विटरने इस्कॉनचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. यातून ट्विटर आणि हिंदुद्वेष जणू समीकरण बनल्याचे दिसते आहे. जगाच्या पाठीवर कुठेही हिंदूंवर अत्याचार होत असेल आणि त्यावर जागरूक हिंदू ट्विटरवर जनजागृती करू लागले की लगेचच संबंधीत व्यक्ती किंवा संस्थेचे ट्विटर अकाउंट त्यांना काहीही न कळवता बंद केले जाते. असे प्रकार वारंवार घडत आहेत. बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे. Shirkana of Hindus in Bangladesh; But in the action of Twitter, ISKCON’s Twitter account is closed … !!
बांगलादेशात तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेले अत्याचार तेथील प्रसार माध्यमे लपवत आहेत. त्यामुळे या अत्याचाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न हिंदूंनी सुरु केला. त्यासाठी बांगलादेशातील ‘इस्कॉन’ आणि ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांच्या ट्विटर हँडलने पुढाकार घेतला. तर या संस्थांचे ट्विटर अकाउंट ट्विटरने तडकाफडकी बंद केले. हिंदूस्थन पोस्टने ही बतमी दिली आहे.
कारण या माध्यमातून बांगलादेशात सुरु असलेल्या हिंदू विरोधी अत्याचाराची माहिती जगाला मिळत होती, त्यामुळे जगभरातील हिंदूंनी बांगलादेशातील सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढविलला होता. विशेष म्हणजे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलेल्या संस्थांपैकी इस्कॉन संस्था ही स्वतः या हल्ल्यांमध्ये पीडित आहे. बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी हल्ला करून २ कृष्ण भक्तांची हत्या केली आहे.
२३ ऑक्टोबरला इस्कॉनचे जागतिक आंदोलन!
जगभरातील इस्कॉनने बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात २३ ऑक्टोबर रोजी जगभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जगभरातील हिंदूंनी ते ज्या ज्या देशात आहेत, तिथे जिथे कुठे इस्कॉनचे आंदोलन होणार आहे, त्याची माहिती घेऊन त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे
बांगलादेश सरकारच्या विनंतीवरून हे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर या ट्विटर अकाउंटवरून हिंदूंवरील अत्याचाराचे व्हिडिओ प्रसारित झाल्याने शेख हसीना सरकार घाबरले, हे स्पष्ट होते, अशी टीका नेटिझन्सनी केली आहे.
यापूर्वी ‘या’ हिंदुत्वनिष्ठांचे ट्विटर अकाउंट केले बंद!
कंगना राणावत – पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्या ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दंगली केल्या, हिंदूंवर हल्ले केले. त्याचा सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिने विरोध केल्यामुळे तिचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले.
पायल रोहतगी – कंगनाप्रमाणे बेधडकपणे मतप्रदर्शित करणारी हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री पायल रोहतगी हिचेही ट्विटर अकाउंट ट्विटरने बंद केले.
जागृती शुक्ला – टीव्ही अँकर आणि ज्येष्ठ पत्रकार जागृती शुक्ला हीदेखील राष्ट्रविरोधी कृत्यांचा कडक भाषेत समाचार घेत होती, तिचेही ट्विटरने नोव्हेंबर २०१८मध्ये अकाउंट बंद केले.
फ्रांसुआ गोतिए – मूळचे फ्रांस नागरिक असलेले आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, भारतीय इतिहास अभ्यासक फ्रांसुआ गोतिए यांनीब्रिटिशांच्या वसाहतवाद या अमानवीय यंत्रणेवर आसूड उगारणारे पुस्तक ‘एॅन एन्टायरली न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया’ (भारताचा एकदम नव्या पद्धतीने लिहिलेला इतिहास) हे पुस्तक लिहिले. त्यासंबंधी ट्विट केल्यानंतर त्यांचे अकाउंट बंद केले.
Shirkana of Hindus in Bangladesh; But in the action of Twitter, ISKCON’s Twitter account is closed … !!
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप उभा करेल सिल्वासात उभा छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा
- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात उचलले मोठे पाऊल , 50 कोटींचा मानहानीचा दाखल केला खटला
- भारताने कोरोना लसीकरणात 99 कोटींचा टप्पा गाठला, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया यांनी ट्विटरवरून दिली माहिती
- ‘टार्गेट किलींग ‘ प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला, एजन्सी करेल पाकिस्तानचा पर्दाफाश
- CONGRESS : नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी ; दहा वर्षांपासून प्रवक्ते असणारे सचिन सावंत यांचा राजीनामा