• Download App
    योगी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास उत्तर प्रदेश सोडणार म्हणणाऱ्या शायर मुनव्वर राणा यांची तब्येत बिघडली, मुलगी निवडणुकीत पाचव्या क्रमांकावर|Shire Munawwar Rana, who said he would leave Uttar Pradesh if Yogi becomes CM again, fell ill, daughter ranked fifth in the polls

    योगी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास उत्तर प्रदेश सोडणार म्हणणाऱ्या शायर मुनव्वर राणा यांची तब्येत बिघडली, मुलगी निवडणुकीत पाचव्या क्रमांकावर

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशात पुन्हा योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यास राज्य सोडून निघून जाऊ म्हणणारे प्रसिध्द शायर मुनव्वर राणा यांना दुहेरी धक्का बसला आहे. निवडणूक निकालानंतर त्यांची तब्येत बिघडली आहे. त्याचबरोबर कॉँग्रेसकडून लढणाºया त्यांच्या मुलीचा निवडणुकीत दारुण पराभव झाला असून त्या पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.Shire Munawwar Rana, who said he would leave Uttar Pradesh if Yogi becomes CM again, fell ill, daughter ranked fifth in the polls

    योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे दुसºयांदा मंत्री बनले तर आपण उत्तर प्रदेश सोडून दुसरीकडे जाऊ अशी घोषणा त्यांनी केली होती. कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी राणा यांची भेट घेतली होती. उन्नाव जिल्ह्यातील पुरवा येथून मुनव्वर राणा यांची मुलगी उरूसा राणा यांना उमेदवारी दिली होती.



    मात्र, उरुसा यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. पुरवामधून भाजपचे अनिल कुमार सिंह यांनी विजय मिळविला आहे.मुनव्वर राणा यांनी आपल्या घोषणेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली आहे.

    मुनव्वर राणा म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत तर आम्ही वाचलो परंतु योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आम्ही वाचू शकणार नाही.

    Shire Munawwar Rana, who said he would leave Uttar Pradesh if Yogi becomes CM again, fell ill, daughter ranked fifth in the polls

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी