• Download App
    पश्चिम बंगालमध्ये "शिंदे पॅटर्न"?; ममतांच्या तृणमूलच्या खासदारांनी फेटाळली शक्यता!! Shinde Pattern in West Bengal?; Mamata's Trinamool MPs rejected the possibility

    पश्चिम बंगालमध्ये “शिंदे पॅटर्न”?; ममतांच्या तृणमूलच्या खासदारांनी फेटाळली शक्यता!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र नंतर आता भाजप पश्चिम बंगालमध्ये “शिंदे पॅटर्न” राबवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेसमध्ये भाजपा फूट पडण्याच्या विचारात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जसे सत्तांतर घडले तसे पश्चिम बंगालमध्ये होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. Shinde Pattern in West Bengal?; Mamata’s Trinamool MPs rejected the possibility

    कारण भाजपचे स्टार प्रचारक मिथुन चक्रवर्ती यांनी तसा दावा केला आहे. तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले आहेत. मात्र, तृणमूल काँग्रेसचे खासदार डोला सेन आणि शंतनु सेन यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. मिथुन चक्रवर्ती हे मोठे अभिनेते आहेत. त्यांना काय स्वप्न पाहायचे ते पाहू द्या. परंतु, पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचे सरकार हलवणे सोपे नाही. ते घडणार नाही, अशा शब्दांमध्ये डोला सेन आणि शंतनु सेन या खासदारांनी “शिंदे पॅटर्न”ची शक्यता फेटाळून लावली आहे.

    मिथुन चक्रवर्ती यांच्या दाव्यामुळे खळबळ 

    भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिथुन चक्रवर्ती गतवर्षीच भाजपामध्ये दाखल झाले होते. बुधवारी, २७ जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधील ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामधील २१ आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे.

    भाजपाच्या मुस्लिमविरोधी प्रतिमेबाबत मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, भाजपा दंगे करतो असा आरोप सातत्याने केला जातो. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, असे आरोप करणे हा केवळ एका कारस्थानाचा भाग आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता आहे त्यामुळेच त्यांचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे.

    Shinde Pattern in West Bengal?; Mamata’s Trinamool MPs rejected the possibility

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!