• Download App
    शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील स्थान पुरते उध्वस्त, केवळ संपर्कामुळे १७ सदस्यांची हकालपट्टी|Shashikala's position in Anna DMK completely ruined, 17 members expelled due

    शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील स्थान पुरते उध्वस्त, केवळ संपर्कामुळे १७ सदस्यांची हकालपट्टी

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तमिळनाडूत एकेकाळी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सत्तेच्या चाव्या पडद्याआडून हलविणाऱ्या वादग्रस्त नेत्या शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील स्थान आता पुरते उध्वस्त झाले आहे. अगदी त्यांच्याशी साधा सवाद ठेवण्यासही आता पक्षाने बंदी घातली आहे.Shashikala’s position in Anna DMK completely ruined, 17 members expelled due

    केवळ त्यांच्याशी संपर्क ठेवल्याबद्दल १७ जणांची पक्षातून हकालपट्टी झाली आहेशशीकला याआधी हंगामी सरचिटणीस होत्या. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शशीकला यांच्याशी संवादाद्वारे जवळीक साधू नये,



    अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा कडक इशारा अण्णाद्रमुक पक्षातर्फे आधीच देण्यात आला होता. त्याचे आता कृतीत रूपांतरही करण्यात आले आणि १७ सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली. ज्यात पक्षाचे प्रवक्ते व्ही. पुगाझेंधी यांचा समावेश आहे.

    पक्षाच्या आमदारांची बैठक पक्षाच्या मुख्यालयात झाली. तीन तास चाललेल्या बैठकीत फोन कॉल लीक होण्यावरून बरीच चर्चा झडली. शशीकला आणि पक्षाच्या काही नेत्यांमधील संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. आपण नजीकच्या भविष्यात पक्षात पुनरागमन करू असे शशीकला यांनी म्हटल्याचे समजते.

    Shashikala’s position in Anna DMK completely ruined, 17 members expelled due

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य