विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या रशिया दौºयावरुन काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी निशाणा साधला आहे. शशी थरुर ट्विट करत म्हणाले की, थोडा जरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर इम्रान खाननी रशिया दौरा रद्द करावा. भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे १९७९ साली चीनच्या दौºयावर होते.Shashi Tharoor’s advice to Imran Khan, citing the example of Atal Bihari Vajpayee
त्यावेळी चीनने व्हिएतनामवर हल्ला केला. त्यामुळे त्याचा निषेध करत वाजपेयींनी आपला दौरा रद्द केला आणि भारतात परतण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाला भेट दिल्यानंतर मॉस्को भेटीसाठी आपण खूप उत्साही असल्याचं सांगितलं. आपण रशियाला भेट दिलेली वेळ ही एकदम परफेक्ट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच रशियाच्या दौºयावर गेले आहेत. इम्रान खान रशियात पोहोचायला आणि रशियाने युक्रेनसोबत युद्धाची घोषणा करायला एकच वेळ झाली आहे. यामुळे विमानतळावर पोहोचताच खान यांनी रशियाने युक्रेनवर हल्ला सुरु केलाय, मी खूप योग्य वेळी आलो आहे. खूप उत्सूक आहे, अशा आशयाचे वक्तव्य केले होते.
मॉस्को विमानतळावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं स्वागत तर झालं. पण रशियन अधिकाºयाने तातडीने त्यांना कारमध्ये बसवलं आणि आपण उद्या भेटू असा संदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाले आहे. अमेरिका आणि मित्रराष्ट्रे रशियावर आक्रमण करण्याच्या पवित्र्यात असताना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान रशियात जाऊन पोहोचले आहेत.
रशियन मंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले. अमेरिकेने खान यांच्या या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जबाबदार देश म्हणून रशियाच्या या पावलावर त्यांनी चिंता व्यक्त करावी असे म्हटले आहे.
इम्रान खान काय म्हणाले-इम्रान खान यांचा मॉस्कोच्या विमानतळावर उतरल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मी किती योग्य वेळी आलो आहे, याची मला खूप उत्सुकता आहे. मी खूपच उत्सुक आहे, असे इम्रान खान म्हणत आहेत. यावेळी इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशीही आहेत.