प्रतिनिधी
नवी दिल्ली : द्वारका काली पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे रविवारी निधन झाले आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाबाबत संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. वयाच्या 99व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. Shankaracharya Swami Swaroopananda: Struggle of the Vishwa Hindu Parishad on the issue of Ram Temple
स्वामीजी वयाच्या नव्वदीतही कार्यरत होते. देशाचे राजकारण, समाजकारण, हिंदुत्व याविषयी त्यांची विशिष्ट मते होती. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनाच्या विषयावर त्यांनी मोठे कार्य केले होते. 1992 मध्ये बाबरी मशीद पडण्यापूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारांनी राम जन्मभूमी वादावर जो तोडगा काढण्याचा प्रयत्न चालवला होता, त्या प्रयत्नांमध्ये स्वामीजींचा सहभाग मोठा होता. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव अटल बिहारी वाजपेयी आदी नेत्यांशी स्वामीजींचा निकटचा संबंध होता. हे नेते धार्मिक आणि सामाजिक वादांमध्ये स्वामी स्वरूपानंद यांच्याशी सल्लामसलत करीत असत.
अयोध्येत सध्या तयार होत असलेल्या राम जन्मभूमी मंदिराबाबत त्यांची मते वेगळी होती. अयोध्येत राम मंदिर बनत नसून विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय बनत आहे, असे ते म्हणत असत.
स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान
स्वामी स्वरुपानंद हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा 99वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. स्वरुपानंद स्वामी हे द्वारका आणि ज्योतिर्मठचे शंकराचार्य होते. स्वातंत्र्यसंग्रामात देखील त्यांनी सहभाग घेतला होता, तसेच अयोध्येतील राम मंदिर लढ्यात देखील त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. ज्योतिषशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
क्रांतिकारी साधू म्हणून नावलौकिक
हिंदुंचे मोठे अध्यात्मिक गुरू अशी त्यांची ओळख होती. अवघ्या 9व्या वर्षी घरादाराचा त्याग करुन त्यांनी धर्मप्रचाराचे काम सुरू केले होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी 6 महिन्यांचा तुरुंगवास सोसला होता. 19 व्या वर्षी ते क्रांतिकारी साधू म्हणून परिचित झाले. 1981 मध्ये त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे हिंदू धर्म अभ्यासक आणि प्रचारक गमावला असल्याची भावना त्यांच्या अनुयायांनी व्यक्त केली आहे.
Shankaracharya Swami Swaroopananda: Struggle of the Vishwa Hindu Parishad on the issue of Ram Temple
महत्वाच्या बातम्या
- राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतात आज एक दिवसाचा राजकीय शोक, अर्ध्यावरती येणार तिरंगा
- अदार पूनावालाच्या नावाने सीरम इन्स्टिट्यूटची फसवणूक, 1 कोटी रुपयांचा गंडा
- नोकरीची संधी : SBI बॅंकेत 5000 पदांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज!!
- महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड, राष्ट्रीय हरित लवादाचा मोठा निर्णय