वृत्तसंस्था
नवी दिल्ली : क्रिक्रेट जगतातील फिरकीचा जादूगार शेन वॉर्नच्या अचानक एक्झिटने क्रिकेट विश्वाला जो शॉक बसला आहे, त्यातून क्रिकेटविश्व अजून उपभरलेले दिसत नाही. अनेक क्रिकेट लेजंड्सनी शेन वॉर्नच्या झळाळत्या कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Shane Warne – You lived life King Size, said Kapil Dev
भारताचा विश्वविजयी सुपरस्टार कपिल देवने शेन वॉर्न, यू लिव्ह लाईफ किंग साईज, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये शेन वॉर्नला श्रध्दांजली वाहिली आहे. क्रिकेट कारकिर्दीत त्याच्या एवढा प्रतिभावंत गोलंदाज पाहिला नसल्याचे मदनलालने म्हटले आहे, तर शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने हे जीवन किती अनिश्चित आहे, याची जाणीव होते, असे भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार विराट कोहलीने नमूद केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग शेन वॉर्नला पंटर अशा टोपण नावाने संबोधायचा. त्याच पंटर नावाचा उल्लेख करून त्याने शेन वॉर्नला श्रध्दांजली वाहिली आहे. तर शेन वॉर्नला जीवनात खूप यश मिळाले आणि त्यानेही आपल्या प्रतिभेने अनेकांची जीवने चांगल्या अनुभवांनी समृध्द केली, अशा भावना ग्लेन मॅग्रार्थ याने व्यक्त केल्या.
सोशल मीडियावर शेन वॉर्न सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे. भारत – श्रीलंकेच्या खेळाडूंनी आजच्या खेळाची सुरवात मैदानावर शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहून केली. या खेळाडूंनी आपल्या खांद्यावर काळ्या फिती लावल्या आहेत.