वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील दारू घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय चौकशी करत असताना आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड बेफाम झाले आहेत. मनीष सिसोदिया यांच्या समर्थनाच्या घोषणा देताना आम आदमी पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी “मर गया मोदी” अशा घोषणाही दिल्या. या घोषणांना विरोध करण्याऐवजी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते या घोषणांचे निर्लज्जपणे समर्थन करत आहेत. Shameless support from Aam Aadmi Party
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी “मोदी तेरी कबर खुदेगी” अशा घोषणाही दिल्या होत्या. त्यावेळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोधात पोलिसांमध्ये तक्रारी दाखल झाल्या होत्या. आता आम आदमी पार्टीच्या कार्य महिला कार्यकर्त्यांनी त्यापुढे जाऊन फतेहपूर बेरी पोलीस ठाण्यासमोर “मर गया मोदी” अशा घोषणा दिल्या आहेत.
या घोषणांना विरोध करण्याऐवजी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते नीरज यांनी त्या घोषणांचे समर्थन केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भारताचे भावी पंतप्रधान आहेत. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली तेव्हा कोणी त्या घोषणाबाजांना विचारले नाही पण मोदींविरोधात घोषणाबाजी झाली की लगेच पत्रकार विचारायला आमच्यासमोर आले, अशा शब्दांत निरज यांनी “मर गया मोदी” या घोषणांचे निर्लज्जपणे समर्थन केले आहे.
Shameless support from Aam Aadmi Party
महत्वाच्या बातम्या
- कांदा निर्यातीवर केंद्राची बंदी नाही; तरी सुप्रिया सुळेंकडून दिशाभूलीचे ट्विट; दादा भुसेंचीही अजब मागणी
- लंडनहून येऊन तरुणीने कसब्यात बजावला मतदानाचा हक्क; पण राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे पाटलांनी केला गोपनीयतेचा भंग!!
- काँग्रेस अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस : राहुल गांधी आणि खरगे यांचे भाषण; त्यानंतर दुपारी 3 वाजता मेगा रॅली