• Download App
    बलात्काराबाबत राजस्थानच्या मंत्र्यांचे निर्लज्ज वक्तव्य, म्हणाले राजस्थान पुरुषांचाच राहिला आहे त्याला काय करणार?|Shameless statement of Rajasthan minister about rape, said Rajasthan is left to men, what will he do?

    बलात्काराबाबत राजस्थानच्या मंत्र्यांचे निर्लज्ज वक्तव्य.. म्हणाले, राजस्थान मर्दांचा प्रदेश.. त्याला काय करणार?

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : बलात्कारासारख्या संवेदनशील विषयावर राजस्थानच्या कॉँग्रेसच्या मंत्र्याने निर्लज्ज विधान केले आहे. बलात्कारात राजस्थान पहिल्या क्रमांकावर का आहे? याविषयी बोलताना वीज पुरवठा मंत्री एस. के. धारीवाल म्हणाले, आता हे असं का आहे? कुठे ना कुठे चूक तर आहेच. तसाही राजस्थान पुरुषांचाच प्रदेश राहिला आहे. आता त्याचं काय करणार?Shameless statement of Rajasthan minister about rape, said Rajasthan is left to men, what will he do?

    राजस्थानच्या विधिमंडळात सध्या अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान राज्यातल्या बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान धारीवाल यांनी यासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी लागलीच सारवासारव करण्याचा प्रयत्न करत माफी मागितली.



    धारीवाल म्हणाले, बलात्कार आणि हत्येच्या बाबतीत राजस्थान ११व्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, तिसऱ्या क्रमांकावर आसाम, चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र, पाचव्या क्रमांकावर ओडिशा, सहाव्या क्रमांकावर तेलंगणा, सातव्या क्रमांकावर तेलंगणा आणि आठव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. पण बलात्काराच्या बाबतीत आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. यात कोणताही संभ्रम नाही.

    हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर धारीवाल सारवासारव करताना म्हणाले, मी नेहमीच महिलांचा आदर केला आहे. त्यांना सर्वच क्षेत्रात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. माझ्याकडून चुकून ते विधान बोललं गेलं. मला खरं तर या प्रदेशात हा प्रकार कुठून आला असं म्हणायचं होतं. पण त्याऐवजी मी हा पुरुषांचा प्रदेश आहे असं म्हणालो. यासाठी मी सभागृहात माफी मागेन.

    Shameless statement of Rajasthan minister about rape, said Rajasthan is left to men, what will he do?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??