वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘शक्तिमान’ आता रुपेरी पडद्यावर झळकणार असून अभिनेते मुकेश खन्ना यांच्याकडून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘Shaktiman’ will now shine on the silver screen; Movie teaser released by Mukesh Khanna
दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान.’ शक्तिमान या पहिल्या भारतीय सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत मनावर जादू केली होती. आता हाच सुपरहिरो चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘शक्तिमान’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शक्तिमान चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझर व्हिडीओच्या सुरुवातीला ते बोलताना दिसत आहेत की, ‘मी तुम्हाला सांगायला उशिर केला आम्ही शक्तिमान चित्रपट करत आहोत. मी तुम्हाला जे वचन दिले होते ते आज पूर्ण करत आहे. शक्तिमान चित्रपटाची घोषणा केली आहे.’
‘Shaktiman’ will now shine on the silver screen; Movie teaser released by Mukesh Khanna
महत्त्वाच्या बातम्या
- हिजाब वादाचे पडसाद; बुलडाण्यात १४४ कलम लागू; मोर्चा, निर्दशने आणि आंदोलनास मनाई
- अनिल देशमुखांच्या चुलत भावाच्या कंपन्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बेकायदेशीर रक्कम वाटप; ईडीला संशय
- कोरोना संपल्यानंतरच जनतेची मास्कमधून मुक्ती; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक वक्तव्य
- मुंबई महापालिका निवडणूक : एकीकडे प्रशासक नेमण्याची तयारी; दुसरीकडे 125 जागा जिंकण्याचा शिवसेनेचा दावा!!
- महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन