• Download App
    सिरमला मुलांवरील चाचण्यांसाठीची परवानगी केंद्र सरकारने नाकारली|Serum was denied permission by the central government to conduct tests on children

    सिरमला मुलांवरील चाचण्यांसाठीची परवानगी केंद्र सरकारने नाकारली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोव्होव्हॅक्स लशीची मुलांवर चाचणी घेण्यासाठी सीरम इंडिया इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारच्या आयोगाने परवानगी नाकारली आहे.या चाचण्यांना देशात मार्चमध्ये प्रारंभ झाला, मात्र केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संघटनेच्या विषय तज्ज्ञ समितीने मुलांबाबत नकार दिला.Serum was denied permission by the central government to conduct tests on children

    कोणत्याही देशाने या लशीला अद्याप मान्यता दिली नसल्याचे कारण सांगण्यात आले. तीनपैकी दुसऱ्या टप्प्यात दोन ते १७ वयोगटातील मुलांवर चाचण्या घेण्याचे सीरमचे नियोजन होते. विविध १० ठिकाणी या चाचण्या होणार होत्या.



    २ ते ११ आणि १२ ते १७ अशा वयोगटांतील प्रत्येकी ४६० याप्रमाणे ९२० मुलांवर चाचण्यांची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी सोमवारी अर्ज करण्यात आला होता.सध्या प्रौढांवर सुरु असलेल्या प्रयोगशाळेतील चाचण्यांवरून सुरक्षितता आणि रोगप्रतिकारशक्तीची आकडेवारी आधी सादर करावी आणि त्यानंतर मुलांवरील चाचण्यांचे नियोजन पुढे न्यावे अशी सूचना सीरमला करण्यात आली आहे.

    Serum was denied permission by the central government to conduct tests on children

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज